AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या सर्व्हायकल कॅन्सरने घेतला पुनमचा बळी, त्यावर कालच बजेटमध्ये झालीय घोषणा

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते सर्व्हायकल कॅन्सर जगातील महिलांना होणारा चौथा सर्वसामान्य कॅन्सर आहे. 2020 मध्ये जगभरात सहा लाखांहून अधिक या कॅन्सरचे रुग्ण उघडकीस आले होते. 3.42 लाख महिलांचा यात मृत्यू झाला होता. 2020 मध्ये जेवढ्या केसेस उघड झाल्या त्यापैकी 90 टक्के केसेस निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील होते. हा आजार गर्भाशयाच्या खालच्या भागात निर्माण होतो. तो हळूहळू पसरत असल्याने सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

ज्या सर्व्हायकल कॅन्सरने घेतला पुनमचा बळी, त्यावर कालच बजेटमध्ये झालीय घोषणा
poonam pande and nirmala sitaraman Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 02, 2024 | 5:01 PM
Share

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : बोल्ड अभिनेत्री आणि मॉडेल पुनम पांडे हीच्या सव्हार्यकल कॅन्सरने झालेल्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पुनम पांडे हीच्या चाहत्यांना या घटनेने धक्का बसला आहे. त्यानंतर सव्हार्यकल कॅन्सर नेमका कसला आजार आहे. हा आजार कशामुळे होतो याविषयी चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, काल संसदेत बजेटचे भाषण करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना सर्वात जास्त धोका असलेल्या सव्हार्यकल कॅन्सर बद्दल एक महत्वाची घोषणा केली होती. ही घोषणा नेमकी काय होती ते पाहूयात…

9 ते 14 वर्षांच्या मुलींचे लसीकरण

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत बजेट सादर करताना सर्व्हाकल कॅन्सरबाबत एक मोठी घोषणा केली. त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचे अंतरिम बजेट सादर केले. त्यावेळी त्यांनी देशातील 9 ते 14 वर्षांच्या मुलींचे सर्व्हायकल कॅन्सर विरोधात लढण्यासाठी लसीकरण करण्यासंदर्भात सरकारची योजना असल्याचे सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अन्य आरोग्य योजनांबद्दल देखील माहीती दिली. ज्यात आशा कार्यकर्त्या आणि अंगनवाडी कार्यकर्त्या आणि सहकाऱ्यांना आयुष्यान भारतचे लाभ देण्याची घोषणा केली.

सर्व्हायक कॅन्सर जगातील चौथा सर्वसामान्य कॅन्सर आहे. यात महिलांच्या मृत्यूत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषणात सांगितले की आमचे सरकार सर्व्हायक कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 18 वयोगटातील तरुणींचे लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.

सर्व्हायकल कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस

भारतात सर्व्हाकल कॅन्सरच्या दरवर्षी 80 हजाराहून अधिक केसेस उघड होतात. तर 35 हजार महिलांचा त्याने मृत्यू होतो. सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक स्वदेशी लसीची निर्मिती पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने केली आहे. याचे नाव CERVAVAC ठेवले आहे. ही देशातील पहीली सर्व्हायकल कॅन्सरची वॅक्सीन बनली आहे. या लसीची ट्रायलही सर्व वयोगटातील महिलांवर यशस्वी झाली होती.

काय आहे सर्व्हायकल कॅन्सर ?

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होय. महिलांच्या गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. महिलांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. जर वेळीच माहीती झाले तर याचा उपचार होऊ शकतो. परंतू उशीर झाल्यास यात मृत्यू होतो. हा आजार ह्युमन पॅपीलोमा व्हायरसमुळे होतो. त्यास एचपीव्ही म्हणून ओळखले जाते. जे जगभरात सर्वाधिक प्रचलित यौन संचारीत संक्रमण ( एसटीआय ) म्हटले जाते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच