प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच चाहत्याच्या चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणते…

गेल्या आठवड्यात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान, प्रसिद्ध गायिका सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) तिच्या एका पुरूष चाहत्याला स्टेजवर बोलावले आणि त्याला खाली झोपवून त्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

प्रसिद्ध गायिकेने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच चाहत्याच्या चेहऱ्यावर केली लघुशंका, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणते...
Sofia Urista
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Nov 19, 2021 | 1:22 PM

मुंबई : गेल्या आठवड्यात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान, प्रसिद्ध गायिका सोफिया उरिस्ताने (Sofia Urista) तिच्या एका पुरूष चाहत्याला स्टेजवर बोलावले आणि त्याला खाली झोपवून त्याच्या चेहऱ्यावर ‘लघुशंका’ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाल्यानंतर सोफियाने आता या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.

पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त करत सोफिया उरिस्ताने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मी नेहमीच स्टेजवर माझ्या मर्यादेत असते. पण त्या रात्री मी माझी मर्यादा विसरले. मी माझे कुटुंब, माझा बँड आणि माझ्या सर्व चाहत्यांवर मनापासून प्रेम करते. माझा लघुशंकेचा स्टंट योग्य नव्हता, हे मला मान्य आहे. मी याबद्दल माफी मागते, माझा हेतू लोकांना दुखवायचा नव्हता.’

बँडनेही मागितली माफी

सोफियासोबतच तिच्या बँडनेही माफी मागितली आहे. सदरच्या दुर्दैवी घटनेनंतर तिच्या ‘ब्रास अगेन्स्ट’ या बँडनेही सर्व चाहत्यांची माफी मागितली आहे. बँडने त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘सोफिया उरिस्ता खूप उत्साहित झाली होती. हे असं काही घडेल याची आम्हालाही अपेक्षा नव्हती. तरीही आम्ही तुम्हा सर्वाना याची खात्री देऊ शकतो की, आमच्या शोमध्ये हे असे प्रकार पुन्हा दिसणार नाहीत. ही संपूर्ण घटना अनपेक्षित होती.’

नेमकं काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, 11 नोव्हेंबर रोजी लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान सोफिया तिची पॅंट काढताना आणि चाहत्याच्या तोंडावर लघुशंका करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ खूप बघितला जात आहे.

ट्रॅव्हिस स्कॉटच्या कॉन्सर्टमध्येही झाला गोंधळ!

विशेष म्हणजे, सोफियाशिवाय आणखी एक प्रसिद्ध गायक ट्रॅव्हिस स्कॉटचा लाईव्ह कॉन्सर्टही प्रचंड चर्चेत होता. ट्रॅव्हिसच्या सादरीकरणादरम्यान, प्रचंड चेंगराचेंगरी झाली, ज्यानंतर त्याच्या अर्धा डझनहून अधिक चाहत्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हिसने इंस्टाग्राम पोस्टवर याबद्दल दुःख व्यक्त केले. मात्र, बरेच लोक त्याच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत.

कोण आहे सोफिया उरिस्ता?

2016 मध्ये सोफियाने अमेरिकेतील लोकप्रिय सिंगिंग ‘शो द व्हॉईस’मध्ये भाग घेतला होता. तिने आपल्या आवाजाने प्रसिद्ध गायिका मायली सायरसचे मन जिंकण्यात यश मिळवले होते. गायिका बनण्याच्या तिच्या निर्णयावर सोफियाचे कुटुंब खूश नव्हते, पण शेवटी ती एक संगीत कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली.

हेही वाचा :

Farm Laws | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, प्रतिक्रिया देताना तापसी पन्नू म्हणते…

Hina Khan | हिना खानने बाथटबमध्ये केलं फोटोशूट, बोल्ड फोटोंनी घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ!

Happy Birthday Sushmita Sen | ‘मिस इंडिया’च्या स्पर्धेत ऐश्वर्या रायला दिली तगडी टक्कर, एका प्रश्नाचं उत्तर देत सुष्मिताने जिंकली मने!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें