‘द काश्मीर फाइल्स’ तुम्ही पाहा अथवा पाहू नका; पण याचं भान ठेवा, थिएटरमधल्या वर्तनावर जोरदार चर्चा

| Updated on: Mar 16, 2022 | 7:16 AM

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर तयार झालेला हा काश्मिर फाईल्स चित्रपट एवढा पर्वणीचा शब्द बनला आहे की, आता प्रत्येकाला हा शब्द म्हणजे गुरुकिल्लीच वाटू लागला आहे. हा चित्रपट तुम्हाला काही जण गटागटाने दाखवायला तयार आहेत तर कोणाला हा पाहायचा असेल तर काही जण चित्रपटाचे तिकीट काढून द्यायला तयार आहेत.

द काश्मीर फाइल्स तुम्ही पाहा अथवा पाहू नका; पण याचं भान ठेवा, थिएटरमधल्या वर्तनावर जोरदार चर्चा
The Kashmir Files
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबईः सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. आताच्या घडीला हा चित्रपट (Film) म्हणजे एक ओळख बनला आहे, आणि एका खेळण्यासारखा या चित्रपटाचा उपयोग काही जण करत असतात. लहान मुलांच्या खेळण्याला ज्या प्रकारे चावी दिली की खेळणे चालू होते त्याच प्रकारे ‘काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) म्हटलं की, सोशल मीडियावर (Social Media) एक चळवळ चालू होते. आणि मग सगळे बोलू लागतात, आणि ऐकूही लागतात, ती म्हणजे काश्मीर फाईल्स. चित्रपटगृहातील काही व्हिडिओ जे व्हायरल झाले आहेत ते बघितल्यावर लक्षात येते की, लोकं भावनेची नाही तर देशात असलेल्या प्रशासनाची थट्टा करत आहेत. एकीकडे चित्रपट पाहणाऱ्या चित्रपटगृहात जोरजबरदस्ती करत आहेत तर दुसरीकडे मात्र लोकशाहीची मुल्ये जाणून अशी काही माणसं सोशल मीडियावरुन आवाजही उठवत आहेत.

विवेक अग्निहोत्रीचे दिग्दर्शन आणि अभिनयातील बाप असणाऱ्या अनुपम खेर यांचा अभिनय म्हणजे काश्मिर फाईल्स चित्रपट. विवेक अग्निहोत्री आणि अनुपम खेर ही चित्रपटसृष्टीतील जुनी जाणती माणसं आहेत. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही पाहा अथवा पाहू नका पण चहाची टपरी असू दे की, चौकातील कट्टा असू दे चर्चा सुरु आहे ती फक्त काश्मिर फाईल्सचीच.

तिकीट देऊ पण चित्रपट पाहा

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर तयार झालेला हा ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट एवढा पर्वणीचा शब्द बनला आहे की, आता प्रत्येकाला हा शब्द म्हणजे गुरुकिल्लीच वाटू लागला आहे. हा चित्रपट तुम्हाला काही जण गटागटाने दाखवायला तयार आहेत तर काही जण कोणाला हा पाहायचा असेल तर  काही जण चित्रपटाचे तिकीट काढून द्यायला तयार आहेत. तर काही गट सोशल मीडियावरुन आवाहन करत आहेत की, चला या आपण एकत्र चित्रपट पाहूया.

चित्रपट पाहून शांतपणे घरी जा

‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट काही जण तर स्वतःच्या घरात दाखवण्याच्या तयारीत आहेत. तुम्हालाही अशी आमंत्रण आली असतील नसतील माहिती नाही, पण आपण नेहमी चित्रपटगृहात सिनेमा बघतो त्याच पद्धतीने सिनेमा पाहा, टपरीवर जाऊन चर्चा करा, आणि कायम जात होता त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी शांत पणे घरी पोहचा, असं सांगण्याची वेळ आता काही माणसांवर आली आहे.

चित्रपट पाहण्याची संस्कृती गेली

चित्रपटगृहातील दोन वर्षापूर्वीच्या गोष्ट आठवून पाहा तुम्ही. काय होती चित्रपटगृहाची गोष्ट. दोन अडीच तासानंतर चित्रपट बघून झाला की, सर्वसामान्यपणे सगळी माणसं एक तर आपापल्या घरी निघून जात किंवा निवांतपणे एकाद्या चहाच्या टपरीवर चहा पित थांबत असत. किंवा एक ना अनेक गोष्टीवर चर्चा करत थांबत असायची. शहरातील कुठल्या तरी प्रसिद्ध चहावाल्याच्या टपरीवर जाऊन आयुष्यातील सुख दुःखाच्या गोष्टी करायच्या आणि रात्र झाली असेल घरी जायचं आणि निवांत झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर निघायचं, हीच सर्वसामान्य माणसाची चित्रपट पाहण्याची पद्धत.

स्वतःचा एक माहितीपट तयार होतो

मात्र आता ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट संपल्यानंतर The End अशी अक्षरं पडद्यावर येतात आणि चित्रपटगृहात कुणाच्या तरी मुठी आवळल्या जातात आणि घोषणा देण्याची तयारी करतात. तर कोण भाषण देण्याच्या मूड मध्ये जाते. ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट पाहणाऱ्यांचा स्वतःचा एक मग माहितीपट तयार होतो, आणि तो लोकांना पुन्हा पुन्हा काही तरी सांगण्याची तयारी करतो.

पण काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा

चित्रपट कोणताही असू द्या, तो किती वेळा पाहावा आणि पाहू नये याची गणितं प्रत्येकावर अवलंबून आहेत. त्यामुळे कोणताही चित्रपट तुम्ही कितीही वेळा पाहा, अगदी गरम खिसा थंड होईपर्यंत सिनेमा बघितला तरी चालेल. पण काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, हा चित्रपट पाहा किंवा पाहू नका पण या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा.

चुकीचे भाष्य करु नका

देशातील ज्या ज्या शहरात ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट सुरु आहे, त्या त्या चित्रपटगृहातील अनेक व्हिडिओ काही जण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सिनेमागृहात तुम्ही जरी एकटे गेला असला तरी तुमच्या आजूबाजूला बसलेले लोक आपापल्या कुटुंबियांसोबत आलेले असतात, त्यांनी विनाकारण तुम्ही घाबरवू नका. चित्रपटातील एकाद्या प्रसंगावर चुकीचे भाष्य करु नका, तुम्ही असं सांगत असाल तर तुम्ही आपल्या प्रशासनावर अविश्वास दाखवत आहात असा त्याचा अर्थ होतो. या देशातील कायदा आणइ सुव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी येथील प्रत्येक नागरिक कर भरतो, आणि हा सिनेमा बघून नागरिकांच्या मनात भिती निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य तुम्ही करु नका कारण लोकांचा या प्रशासनावर प्रचंड विश्वास आहे.

लोकशाहीची चेष्टा करू नका

‘काश्मीर फाइल्स’ असू द्या किंवा इतर कोणताही चित्रपट असू द्या माणसांना तुम्ही कोणतेही भावनिक आवाहन करु नका. कोणीही माणूस चित्रपट पाहायला जातो त्याअर्थी तो नक्कीच स्वतः चित्रपट समजून घेऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये एक व्यक्ती पंजाबच्या निवडणुकीवर बोलताना म्हणते की, पंजाबमध्ये गद्दारांना लोकांनी विजयी केले आहे. पंजाबमधील निवडणुकीचा निर्वाळा देत ‘टुकडे टुकडे गँग’ असा WhatsAppचा संदर्भ देत ‘वीज-पाण्यावर लोकं विकले गेली आहेत’, असे सभागृहातच सांगितले जात आहे. हे सांगणे चुकीचे आहे. लोकांची माती भडकावत असाल आणि ही गोष्ट तुम्ही चित्रपटगृहात सांगत असाल तर तुम्ही तुमच्या लोकशाहीची चेष्टा करत आहात. जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताचा गौरव सगळं जग करते त्या बलाढ्य भारताच्या लोकशाहीची तुम्ही थट्टा करत आहात असा त्याचा अर्थ होतो. भारताची ही लोकशाही बनवण्यासाठी अनेक जणांनी देशासाठी आणि लोकशाहीसाठी बलिदान दिले आहे.


चित्रपटगृह मालकावर जबरदस्ती करु नका

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, त्या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक गोष्ट समजते की, चित्रपटगृहाच्या मालकाला चित्रपटावर काही प्रश्न विचारले जात आहेत. मात्र जे लोक चित्रपट पाहायला येतात त्यांना हे कळले पाहिजे की, चित्रपटगृह चालवणे हा एक व्यवसाय आहे. ज्या प्रकारे ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपट बघायला येणारे जसे व्यावसायिक असतात तसाच व्यावसायिक हा चित्रपटगृहमालकही असतो. या चित्रपटगृहाच्या मालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या पोस्टला काही जणांनी आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो अशी कमेंट दिली आहे.


निराधार बोलणे टाळा

हा एक व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, ज्या प्रकारे तुम्ही अमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांच्या चित्रपटावर तुम्ही बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहात त्याचा संदर्भ काय आहे तर त्याचा संदर्भही चित्रपट माध्यमच आहे. त्यामुळे बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे ते कोणत्या गोष्टीवर.

 

संबंधित बातम्या

The Kashmir Files: स्टुडिओत ‘द काश्मीर फाईल्स’वर बोलताना अनुपम खेर, विवेक अग्निहोत्रींचे डोळे पाणावले

Video: वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

“बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले”; ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनाचा टोला