AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हाऊज द जोश? हाय सर…’, विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ (Uri: The Surgical Strike) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता.

'हाऊज द जोश? हाय सर...', विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
| Updated on: Jan 26, 2021 | 10:04 AM
Share

मुंबई : अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ (Uri: The Surgical Strike) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग आजपण प्रत्येकाच्या तोंडावर आहे. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. आणि या चित्रपटाला लोकांनी उदंड प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटामधील विक्की कौशलच्या दमदार अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता बातमी अशी आहे की, हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. (The movie ‘Uri: The Surgical Strike’ will be released again today)

तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “त्याच थिएटरमध्ये परत येत आहे ज्याने 2019 मध्ये लोकांची मने जिंकली. मुंबई, पुणे, कोलकाता, नोएडासह देशातील 29 शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी हा चित्रपट कारगिल विजयदिनी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये बेस्ट डायरेक्शन, बेस्ट ऑडियोग्राफी, बेस्ट म्युझिक डायरेक्शन आणि बेस्ट अ‍ॅक्टर यांचा समावेश आहे. ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’

हा चित्रपट 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा चित्रपट आहे.

संबंधित बातम्या : 

Posco Act Case : लैंगिक अत्याचारासंबंधी न्यायालयाच्या त्या निर्णयावर रितेशची उघड-उघड नाराजी, म्हणतो….

RRR Poster Out | वर्षातल्या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज, या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

(The movie ‘Uri: The Surgical Strike’ will be released again today)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.