Aashiqui 3 | अखेर ‘त्या’ चर्चांवर आशिकी 3 चित्रपटाच्या निर्मात्याचा मोठा खुलासा, अभिनेत्रीबद्दल…

कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. कार्तिक आर्यन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Aashiqui 3 | अखेर त्या चर्चांवर आशिकी 3 चित्रपटाच्या निर्मात्याचा मोठा खुलासा, अभिनेत्रीबद्दल...
| Updated on: Oct 25, 2023 | 9:55 AM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan) याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचे हे चित्रपट मोठे धमाके करताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन याचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली. ज्यावेळी बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट जबरदस्त कामगिरी करताना दिसले.

कार्तिक आर्यन याच्यासोबत सत्यप्रेम की कथा या चित्रपटामध्ये कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसली. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले. कार्तिक आर्यन हा सोशल मीडियावर देखील चांगलाच सक्रिय दिसतोय. कार्तिक आर्यन काही दिवसांपूर्वी त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करताना दिसला.

कार्तिक आर्यन आणि तारा सुतारिया यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरून यांच्या अफेअरच्या चर्चा या सुरूवातीला रंगताना दिसल्या. मात्र, त्यानंतर काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, तारा सुतारिया ही आशिकी 3 चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत काम करताना दिसणार आहे. यानिमित्त हे दोघे भेटले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

आता यावर नुकताच आशिकी 3 चित्रपटाच्या निर्मित्यांनी मोठा खुलासा केलाय. आशिकी 3 चित्रपटाचे निर्माता मुकेश भट्ट यांनी म्हटले की, या सर्व अफवाच आहे. पुढे ते म्हणाले की सध्या विविध चर्चा सुरू आहेत. दर आठवड्याला काही अभिनेत्रींची नावे चित्रपटासोबत जोडली जात आहेत. मात्र, अजूनही कोणत्याच अभिनेत्रीला आम्ही चित्रपटासाठी फायनल केले नाहीये.

चित्रपटाचे म्यूजिक जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत अभिनेत्री फायनल होणार नसल्याचे देखील सांगितले. कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यामधील वाद मिटल्याचे बघायला मिळतंय. कार्तिक आर्यन याचे काैतुक करताना काही दिवसांपूर्वीच करण जोहर हा दिसला. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सतत रंगताना दिसतंय.मध्यंतरी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.