
झगमगत्या विश्वात कधी काय होईल सांगता येत नाही… आता देखील एका अभिनेत्री मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्री काजोल हिच्या ‘द ट्रायल’ सिनेमात झळकलेली अभनेत्री नूर मालाबिका दास हिने वयाच्या 32 व्या वर्षी स्वतःला संपवलं आहे. अभिनेत्री मुंबईतील जुहू येथील राहत्या घरात स्वतःला संपवलं आहे. पोलिसांनी नूर हिचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सांगायचं झालं तर, नूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. 6 जून रोजी अभिनेत्रीने स्वतःला संपवलं. मृत्यूच्या आधी नूर हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये फोटोशूट करताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. अभिनेत्री दुःखी वाटत होती. शिवाय व्हिडीओच्या बॅकग्राउंडला देखील सॅड सॉन्ग होतं.
व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘याठिकाणी फक्त एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे नूर हिचा… जो इतर कोणाशीही जुळत नाही आणि मला आरसा पाहण्याची गरज नाही माझे सौंदर्य तुझ्या प्रतिबिंबानुसार आहे. माझा आरसा हे जग आहे कधी गोड, कधी चांगलं, कधी मूर्ख, कधी खेळकर, कधी खोडकर, कधी आनंदी, कधी दयाळू, कधी मस्त, कधी आगळी, कधी बालिश, कधी परिपक्व.. स्विंगनुसार…’
नूर हिने इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये अभिनेत्रीने पार्लरमध्ये स्वतःचं टक्कल केलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा रंगली आहे.
अभनेत्री नूर मालाबिका दास हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनय विश्वात पाऊल ठेवण्यापूर्वी नूर एयर होस्टेस म्हणून काम करत होती. अभिनय विश्वात यशाच्या शिखरावर चढत असताना नूर हिने टोकाचं पाऊल उचललं आहे. ‘द ट्रायल’ शिवाय नूर हिने ‘सिसकिया’, ‘वॉकमॅन’, ‘तिखी चटणी’, ‘जघन्य उपाय’, ‘चरम सुख’ यांसारख्या अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे.
अभनेत्री नूर मालाबिका दास सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायची. अचानक अभिनेत्री घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.