‘मी त्याला मारूनच टाकलं…’, स्विगी बॉयवर का भडकला रोनित रॉय, नक्की झालं तरी काय?

Swiggy Boy | सर्वजनिक ठिकाणी स्विगी बॉयने केलं तरी काय? भडकलेल्या रोनित रॉय म्हणाला, 'मी त्याला मारूनच टाकल...', काय आहे प्रकरण? अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला संताप...

मी त्याला मारूनच टाकलं..., स्विगी बॉयवर का भडकला रोनित रॉय, नक्की झालं तरी काय?
| Updated on: Feb 26, 2024 | 12:08 PM

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : नुकताच एका स्विगी डिलिव्हरी बॉयचे प्राण जाता-जाता बचावले आहे. याप्रकरणी अभिनेता रोनित रॉय याने एक ट्विट देखील केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत रोनित याने स्वतःचा संताप व्यक्त केला. एवढंच नाही पोस्ट शेअर करत स्विगीला टॅग करत रोनित याने नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलेल्या प्रकार देखील सांगितला.

एक्स (ट्विट)वर अभिनेता म्हणाला, ‘जवळपास मी स्विगी बॉयचे प्राण घेतलेच होते…’ याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला, ‘स्विगी.. मी तुमच्या रायडरला जवळपास मारलंच होतं. इलेक्ट्रिक मोपेड चालवण्याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही ट्राफीक न पाहाता ट्राफीकमधून गाडी चालवाल. तुम्हाला त्याच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही, की फक्त व्यवसाय सर्वकाही आहे… असंच सुरु राहिल…’ सोशल मीडियावर अभिनेत्याने केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

ट्विटवर फक्त स्विगी नाही तर, अन्य नेटकऱ्यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘यामध्ये स्विगीची काय चुकी आहे? चुकीच्या बाजून गाडी चालवायची नाही…यांसारखे सर्वसामान्य नियम देखील माहिती नाहीत का?’ यावर स्विगीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

स्विगीकडून आलेली प्रतिक्रिया

‘हाय रोहित… आमचे डिलिव्हरी पार्टनर्स सर्व नियमांचं पालन करतील अशी आम्ही अपेक्षा करतो…तुम्ही मांडलेल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष केंद्रीत करु… तुमच्याकडे कोणती माहिती असेल तर आमच्यासोबत शेअर करा ज्यामुळे आम्हाला कारवाई करायला मदत होईल…’ याआधी देखील डिलिव्हरी बॉयमुळे स्विगी वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.

रोनित रॉय याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. रोनित याच्या चाह्त्याची संख्या देखील फार मोठी आहे. काही दिवसांपूर्वी रोनीत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. रोनित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने पत्नीशीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्याचे व्हिडीओसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. रोनित रॉय आणि नीलम बोस यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी साडेतीन वर्षांपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित होते.