‘मिर्झापूर’ फेम बिनाने मागितलं काम, तेव्हा मिळाली भूमिका, सांगितलं कसे झाले इंटिमेट सीन शूट
Mirzapur | भूमिकेसाठी दिग्दर्शकांना केले फोन, बैठकीत चर्चा झाल्यानंतर... 'मिर्झापूर' फेम बिनाला कसं मिळालं काम, इंटिमेट सीन शूटिंगबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रसिका दुग्गलची चर्चा...

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या पडद्यावर सीन प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला… असंच काही ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्री रसिका दुग्गल हिच्यासोबत देखील झालं आहे. सीरिजमध्ये रसिका दुग्गल हिने कालीन भैय्या म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीची भूमिका साकराली होती.. ‘मिर्झापूर’ सीरिजला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आता ‘मिर्झापूर’ सीरिजचा पुढील भाग येणार आहे. पण नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री सीरिजमध्ये भूमिका कशी मिळाली आणि इंटिमेट सीन कसे शूट झाले याबद्दल सांगितलं आहे.
रसिका दुग्गल म्हणाली, ‘मिर्झापूरमध्ये मला भूमिका कशी मिळाली… ही मोठी मोठी स्टोरी आहे. माझा एक मित्र आहे. त्याला कळलं करण अंशुमन एक शो करत आहे. मी त्यालाम मी तर ओळखते त्याला… अनेकदा मी करणला भेटली देखील आहे. करण मला ओळखतो, जर त्याच्याकडे माझ्यासाठी कोणती भूमिका असेल तर, तो मला फोन करेल…’
‘यावर माझा मित्र म्हणाला, तुला काम हवं आहे तर, तू स्वतः करणला फोन कर. पण मला ते योग्य वाटत नव्हतं. आपण स्वतःहून कसं विचारणार, समोरच्या व्यक्तीला काय वाटेल… असं मी म्हणाली. पुढे माझा मित्र म्हणाल, करणकडे तुझ्यासाठी कोणती भूमिका असेल तर, तो तुला बोलवेल… नाही तर विषय सोडून द्यायचा. पण तू प्रयत्न करायला हवेत..’
अखेर रसिका हिने करण याला फोन केला आणि म्हणाली, ‘तू एक शो करत आहेस, असं ऐकलं… कोणती भूमिका असेल तर मला सांग. यावर करणने क्षणाचा देखील विलंब न करता मला होकार दिला आणि भेटायला बोलावलं…’ अशा प्रकारे रसिका हिने ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये इंटिमेट सीन कसे झाले शूट?
सीरिजमध्ये शिवीगाळ, सेक्स सीन असतील याची कल्पना मला होती. यावर आमची चर्चा झाली होती. सीन करताना माझी काळजी घेण्यात आली होती. करण आणि गुरमीत यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली होती. किसिंग सीन कसे शूट करायचे..
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सीन शूट करताना कोणतीही अडचण आल्यास मला तात्काळ तक्रार करण्याचा परवानगी होती. मला योग्या वाटत नसल्यास सेटवर उपस्थीत असलेल्या प्रत्येकाला बाहेर काढलं होतं. पण आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की, मला आता प्रोजेक्ट्स मध्ये इंटिमेसी दिग्दर्शक असतात…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रसिका आणि तिने ‘मिर्झापूर’ सीरिजबद्दल सांगितलेल्या अनेक गोष्टींची चर्चा रंगली आहे.
