लग्नानंतर सासरी सुखी असलेल्या प्रत्येक मुलीचं आवडतं गाणं, 58 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट

लग्नानंतर सासरी जर मुलींना चांगले सुख भेटले तर प्रत्येक नवरी गाते हे गाणं. गेल्या 58 वर्षांपासून या गाण्याची प्रचंड क्रेझ. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलेलं सुपरहिट.

लग्नानंतर सासरी सुखी असलेल्या प्रत्येक मुलीचं आवडतं गाणं, 58 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 21, 2026 | 8:35 PM

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात 80 ते 90 च्या दशकातील गाण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे दिसत आहेत. आजही अनेक चाहते हे 90 च्या दशकातील गाण्याचे प्रचंड चाहते आहेत. असंच एक 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरस्वतीचंद्र’ या चित्रपटातील ‘मैं तो भूल चली बाबुल का देश’ हे गाणे आजही लग्नानंतरच्या नव्या आयुष्याशी जोडलेल्या भावनांना सुंदरपणे व्यक्त करते.

लता मंगेशकर यांच्या आवाजात, इंदीवर यांच्या लेखणीतून आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताने सजलेले हे गाणं नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. सुमारे 58 वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता आणि गोडवा कायम आहे.

या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधे आणि भावस्पर्शी शब्द. नववधू आपल्या माहेरापासून दूर गेल्यानंतर नव्या घराला आपलेसे करताना दिसते. सासरच्या घरातील नात्यांमध्ये तिला माहेरच्या माणसांचीच छबी जाणवते. नणंदीत तिला बहिणीचा जिव्हाळा दिसतो तर सासूमध्ये आईची माया आणि सासऱ्यांमध्ये वडिलांची प्रतिमा दिसते.

लग्नानंतर मुलीसमोर उभे राहणारे नवे घर केवळ अनोळखी ठिकाण न राहता प्रेम, आपुलकी आणि नात्यांनी भरलेले घर कसे बनते याचे सुंदर चित्र या गाण्यातून उभे राहते.

लता मंगेशकर यांच्या आवाजाने गाणं ठरल लोकप्रिय

लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे हे गाणं अधिक प्रभावी बनले. इंदीवर यांनी अतिशय सोप्या भाषेत नववधूच्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या. कल्याणजी-आनंदजी यांच्या चालीत लोकसंगीताची झलक जाणवते. त्यामुळे गाण्याला प्रसन्न, चैतन्यमय आणि काहीशी चंचल लय मिळाली आहे.

विशेष म्हणजे हे गाणं केवळ विदाईच्या दुःखाभोवती फिरत नाही. उलट, माहेर सोडल्यानंतर नव्या संसारात मिळणाऱ्या प्रेमाचा आणि नव्या नात्यांचा आनंद यात व्यक्त होतो. पतीचे घर आणि पतीचे प्रेम आपलेसे झाल्याची भावना गाण्यामधून दिसून येते.

काळ बदलला, पण गाण्याची क्रेझ कायम

आजच्या काळात लग्नाच्या पद्धती, कुटुंबव्यवस्था आणि जीवनशैलीत अनेक बदल झाले असले तरी माहेर सोडून नव्या घरात जाणाऱ्या मुलीच्या मनातील भावना तितक्याच जिवंत आहेत. म्हणूनच ‘मैं तो भूल चली बाबुल का देश’ हे गाणं आजही लग्नसमारंभात आणि नव्या संसाराच्या आठवणींमध्ये आवर्जून ऐकले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us