AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 वर्षांत बॅक-टू-बॅक 30 सिनेमे फ्लॉप; अखेर त्या एका चित्रपटामुळे 66 वर्षांचा अभिनेता बनला सुपरस्टार

बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणारा प्रत्येक चित्रपट हिट होईलच असं नाही. काही चित्रपटांना तुफान यश मिळतं, तर काही फ्लॉप ठरतात. करिअरमधील चार-पाच चित्रपट फ्लॉप ठरले तरी कलाकारावर त्याचा फार मोठा परिणाम होत नाही. पण फ्लॉप होण्याचा आकडा जर 30 असेल तर..

22 वर्षांत बॅक-टू-बॅक 30 सिनेमे फ्लॉप; अखेर त्या एका चित्रपटामुळे 66 वर्षांचा अभिनेता बनला सुपरस्टार
Sunny Deol Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2023 | 3:09 PM
Share

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | बॉक्स ऑफिसवर हिट आणि फ्लॉप चित्रपटांची मालिका सतत सुरूच असते. पण जर एखाद्या कलाकाराचे चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरत असले, तर त्याचं करिअर संकटात येतं. बॉलिवूडमध्ये असाच एक अभिनेता आहे, ज्याने दोन दशकांत अनेक फ्लॉप चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले. मात्र वयाच्या 66 वर्षी त्याने स्वीकारलेल्या एका चित्रपटाच्या ऑफरमुळे नशिबच पालटलं. यावर्षी त्याचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाला आणि दोन दशकांपासून गमावलेलं स्टारडम त्याला परत मिळालं. म्हणूनच प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अनेक मुलाखतींमध्ये तो भावूक झाला होता. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सनी देओल आहे.

सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सध्या या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन चित्रपट आहेत. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण ‘गदर 2’च्या आधी सनी देओलचे दोन-चार नव्हे तर तब्बल 30 चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले होते. त्याचं करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर होतं. अखेर वयाच्या 66 व्या वर्षी सनी देओलने ‘गदर 2’ या चित्रपटाद्वारे जबरदस्त कमबॅक केलं. या चित्रपटाचं यश पाहून इंडस्ट्रीत मोठमोठे कलाकार सनी देओलची भेट घेण्यासाठी पोहोचले होते.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सनी देओलच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत ‘चुप’, ‘ब्लॅक’, ‘भैय्याजी सुपरहिट’, ‘मोहल्ला अस्सी’, ‘यमला पगला दिवाना फिर से’, ‘पोस्टर बॉईज’, ‘घायल वन्स अगेन’, ‘आय लव्ह न्यूयॉर्क’, ‘सिंह साहब दी ग्रेट’, ‘खुदा कसम’, ‘राइट या राँग’, ‘फॉक्स’, ‘काफिला’, ‘बिग ब्रदर’, ‘नक्सा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यादरम्यान ‘अपने’ आणि ‘यमला पगला दिवाना’ हे दोन चित्रपट थोड्याफार प्रमाणात गाजले होते. मात्र ‘गदर 2’च्या आधी सनी देओलचा ‘इंडियन’ हा चित्रपट यशस्वी ठरला होता. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता.

‘गदर 2’च्या यशाने सनी देओलला पुन्हा एकदा सुपरस्टार बनवलं आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 40 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. तर जगभरात या चित्रपटाने 691 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?