29 वर्षांनी मोठ्या हिरोशी केला रोमान्स, लोक म्हणाले – करिअर बरबाद.., वादात राहून ‘मनहूस’ बनली सुपरस्टार

'जब जिंदगी एक बार मिली है तो दो बार क्यों सोचे' हाच विचार करून या अभिनेत्रीने चित्रपट साईन केला. कधी 'मनहूस'म्हणवली जाणारी ही स्टार वादात सापडूनही अखेर सुपरस्टार बनली. तिच्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने मोठा धमाका केला आणि 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. या चित्रपटाने तिला एक नवी ओळख मिळवून दिली. जे जोखीम स्वीकारतात तेच इतिहास घडवतात, तिनं सिद्ध केलं. कोण आहे ती ?

| Updated on: Jan 01, 2026 | 3:38 PM
1 / 9
आपली ओळख सिद्ध करण्याच्या निर्धाराने जेव्हा या अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं, तेव्हा कोणीच विचार केला नव्हता की ही पुढे जाऊन एवढी मोठी स्टार बनेल आणि अख्ख्या इंडस्ट्रीला आव्हान देईल. करिअरच्या सुरूवातीला टीव्ही, प्रादेशिक चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्ये वारंवार नकार मिळूनही ती प्रयत्न करत राहिली. पण तिला जेव्हा मोठा चित्रपट मिळाला तेव्हा तिच्या कथेला नवं वळण मिळालं. या चित्रपटात तिने 29 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारसोबत रोमान्स केला. ही खूप मोठी जोखीम होती.  चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिच्यावर खूप टीका झाली, तिचं करिअर संपलं  असंही सुनावण्यात आलं. पण तिच्या ज्या भूमिकेवर टीका झाली, त्यासाठीच नंतर तिचं खूप कौतुकही झालं. (Photos : Social Media)

2 / 9
'कुछ लोगों का नाम उनके काम से होता है. मेरा बदनाम होकर हुआ है...' खरंतर हा चित्रपटातला डायलॉग आहे,पण तो या अभिनेत्रीवरही फिट बसतो. तिने टीव्ही, फिल्म्स आणि बंगाली फिल्म्समध्येही रिजेक्शन सहन केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नव्हे ती आहे, विद्या बालन.

3 / 9
टेलिव्हिजन, चित्रपट आणि बंगाली चित्रपटसृष्टीत असंख्य नकारांना तोंड दिल्यानंतर, विद्या बालनला "परिणीता" चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पहिली मोठी ओळख मिळाली. हा प्रवास सोपा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीत, अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात, तिथे  त्यांची शारीरिक रचना आणि त्यांचा रंग यांना टार्गेट केलं जातं. पण हे सगळं सहन करून विद्याने करिअरची सुरूवात केली, पण एक चित्रपट असा आला ज्याने तिची जुनी ओळख पूर्णपणे बदलली.

4 / 9
हा चित्रपट खूप वादात सापडला. पण या चित्रपटातील तिच्या धाडसी आणि कसदार भूमिकेची केवळ चर्चाच झाली नाही तर तिला एका वेगळ्याच पातळीवर नेले. हा चित्रपट होता "द डर्टी पिक्चर". तो विद्या बालनच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटातून तिला मिळालेले यश आणि ओळख तिच्या कारकिर्दीतील इतर कोणत्याही चित्रपटाने मिळवली नव्हती.

5 / 9
 आज म्हणजेच 1 जानेवारीला विद्या बालन हिचा 47 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने 'द डर्टी पिक्चर' बद्दल काही अनोखे फॅक्ट्स जाणून घेऊया. हा संपूर्ण स्त्री केंद्रित पिक्चर होता.  नसीरुद्दीन शाह, इम्रान हाशमी आणि तुषार कपूर सारखे कलाकार असूनही या चित्रपटाचा पूर्ण फोकस, लाईमलाइट विद्या बालन हिच्यावर होता.

6 / 9
विशेष म्हणजे हा चित्रपट आधी कंगना रानौतला ऑफर करण्यात आला होता, पण एवढी बोल्ड स्क्रिप्ट ऐकल्यावर तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. पण नंतर, या चित्रपटाला मिळालेलं ऐतिहासिक यश पाहून कंगनालाही तिच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप झाला.

7 / 9
"द डर्टी पिक्चर" हा चित्रपट विद्यासाठी सोपा नव्हता. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिने 12 किलो वजन वाढवले ​​आणि 100 हून अधिक कॉश्च्यूम बदलले. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीत तिची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन 100 ड्रेस डिझाइन करण्यात आले होते. हा चित्रपट बोल्ड सीन्सने भरलेला होता आणि विद्यासाठी ते सोपे नव्हते. अनेक सीन्समध्ये विद्या तिच्यापेक्षा 29 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता नसीरुद्दीन शाहसोबत इंटिमेट सीन करतानाही दिसली. हा चित्रपट दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होता असं म्हटलं जातं.

8 / 9
 विद्याने स्वतः सांगितलं होतं की , या चित्रपटातील बोल्ड सीन्सच्या शूटवेळी सेटवर बहुतांश महिला उपस्थित होत्या, त्या कोरिओग्राफर असोत किंवा मेकअप वर्कर असोत. सेटवरील वातावरण हलके करण्यासाठी, सीन्स शूट करणे सोपे करण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक होती. त्यामुळे मला कॉन्फिडन्स मिळाला आणि मी सहज परफॉर्म करू शकायचे असं विद्याने नमूद केलं.

9 / 9
या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्याचं खूप कौतुक झालं. तिला राष्ट्रीय पुरस्कारासहित इतरही अनेक पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे  हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा विद्याची फी फक्त 1.5 कोटी होती, परंतु चित्रपटाच्या यशानंतर तिचे मानधन दुप्पट झाले. त्यानंतर तिला सलग चित्रपट मिळू लागले. द डर्टी पिक्चर नंतर, विद्या ही कहानी, हमारी अधुरी कहानी, मिशन मंगल, आणि भूल भुलैया 3 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.