AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाहिरातीसाठी लेस्बियन बनली अभिनेत्री… सलमान खान ते भन्साळीपर्यंत सर्वांसह केलं काम, हिला ओळखलंत का ?

उत्कृष्ट अभिनयाने आणि सुंदर लूकने अभिनेत्री अनुप्रिया गोएंकाने नेहमीच स्टीरिओटाइप्स मोडले आहेत. ल्पना मोडल्या आहेत आश्रम आणि असुर या वेब सिरीजमधील भूमिकांसाठी तसेच संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटातील राणी नागमतीच्या भूमिकेसाठी ती विशेष ओळखली जाते.

जाहिरातीसाठी लेस्बियन बनली अभिनेत्री... सलमान खान ते भन्साळीपर्यंत सर्वांसह केलं काम, हिला ओळखलंत का ?
actress
| Updated on: May 29, 2025 | 11:49 AM
Share

भारतात वेब शोचा ट्रेंड वाढल्यापासून, अनेक कलाकारांना मोठ्या संधी मिळू लागल्या आहेत. या वेब शोमुळे अनेक उत्तम कलाकारांना बॉलिवूडमध्ये मोठ्या संधी मिळाल्या आणि लोकांनाही या कलाकारांबद्दल माहिती मिळाली.आज पण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने संजय लीला भन्साळीपासून सलमान खानपर्यंत सर्वांसोबत काम केले आहे आणि आज ती ओटीटीच्या जगात एक मोठे नाव आहे. एवढंचनव्हे तर एका जाहिरातीसाठी ती लेस्बियनही बनली.

ती अभिनेत्री दुसरी , तिसरी कोणा नव्हे तर आहे अनुप्रिया गोएंका, तिने तिचे शानदार लूक्स आणि अभिनयाचं नाण खणखणीत वाजवत अनेक स्टिरीओटाइप्स तोडलेत. ‘आश्रम’ आणि ‘असुर’ या वेबसीरिजमधील तिच्या अनेक भूमिका तर गाजल्याच, पण संजय भन्साली यांचाप्रसिद्ध चित्रपट पद्मावतमध्ये देखील रानी नागमतीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिचा आज वाढदिवस असतो, त्यानिमित्त जाणून घेऊया तिचा प्रवास..

ओटीटीच्या दुनियेतील चर्चेतला चेहरा

अनुप्रिया आज ओटीटी जगात एक लोकप्रिय चेहरा आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने प्रचंड संघर्ष केला आहे. अनुप्रियाचा जन्म 29 मे 1987 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. अनुप्रियाचे वडील रवींद्र कुमार गोएंका हे कापड उद्योगाचे मालक आहेत आणि आई पुष्पा गृहिणी आहेत. तिला दोन मोठ्या बहिणी आणि एक भाऊही हे. दिल्लीतून शिक्षण पूर्ण केल्यावर ती वडिलांना त्यांच्या कामात मदत करू लागली. मात्र 2008 साली ती मुंबईत आली आणि अभिनयाच्या दुनियेत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला.

लेस्बियन तरूणीची साकारली भूमिका

चित्रपटांमध्ये काम मिळण्यापूर्वी, अनुप्रियाने अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले, त्यात ती यूपीए सरकारच्या भारत निर्माण मोहिमेचा भाग बनली. याशिवाय, तिने कोक, गार्नियर, स्टेपफ्री, कोटक महिंद्रा, डाबर सारख्या मोठ्या ब्रँड्ससह अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले. यानंतरच, अनुप्रियाने अशी एक जाहिरात केली, जी करणारी ती पहिली अभिनेत्री बनली. तिने एका ऑनलाइन कपड्यांच्या ब्रँडसाठी लेस्बियन मुलीची भूमिका साकारली. असे करणारी ती पहिली अभिनेत्री होती.

2017 साली अनुप्रिया ही टायगर जिंदा है या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात नर्स पूर्णाची भूमिका साकारताना दिसली. यानंतर, ती संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटात शाहिद कपूरची, पहिली पत्नी राणी नागमतीच्या भूमिकेत देखील दिसली, तिच्या कामाचं समीक्षकांनीही खूप कौतुक केलं. याशिवाय तिने अनेक हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं असून अजूनही ती चित्रपट जगात सक्रिय आहे. अनुप्रियाने ‘आश्रम’, ‘असुर’, ‘क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोज्ड डोअर्स’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या अनेक वेब शोमध्ये देखील काम केलं आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?