
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्मिती संस्था ‘होम्बाले फिल्म्स’ने ‘महावतार नरसिम्हा’ हा ॲनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतके विक्रम रचणार, याची कल्पना खुद्द निर्मात्यांनीही केली नव्हती. भगवान विष्णूच्या चौथ्या अवतारावर आधारित या चित्रपटाने थिएटरमध्ये जबरदस्त कमाई केली. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. ‘महावतार नरसिम्हा’ला ओटीटीवर पाहण्यासाठी असंख्य चाहते उत्सुक आहेत. परंतु या चित्रपटाला टक्कर देणारी अशीच एक पौराणिक ॲनिमेटेड वेब सीरिज ओटीटीवर उपलब्ध आहे. या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी सर्वाधिक 9.1 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच प्रेक्षकांमध्ये ही सीरिज चांगलीच लोकप्रिय आहे.
या पौराणिक ओटीटीवर वेब सीरिजचा उल्लेख इथे केला जात आहे, ती तुम्हाला जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. आतापर्यंत या सीरिजचे सहा सिझन्स स्ट्रीम झाले आहेत आणि सहाचे सहा सिझन्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 2021 मध्ये या सीरिजचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्याच सीरिजला बंपर यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी पुढील सिझन्सवर मेहनत घेतली. ओटीटीवरील ही सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड सीरिज मानली जाते, जी प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना खूप आवडते.
या वेब सीरिजमध्ये ‘रामायण’ ही पौराणिक कथा दाखवण्यात आली आहे. यातील व्हिज्युअल इफेक्ट्स प्रशंसनीय आहेत. ही सीरिज पूर्णपणे हनुमानावर आधारित आहे. जिओ हॉटस्टारवरील या सीरिजचं नाव आहे ‘द लेजंड ऑफ हनुमान’. या सीरिजचे सर्व सिझन खूपच खास असून प्रेक्षकांना मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देतात. सहा सिझन्सच्या यशानंतर निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या सातव्या सिझनसाठी तयारी सुरू केली आहे. या लोकप्रिय ॲनिमेटेड सीरिजचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शरद देवराजन, जीवन जे. कांग आणि चारुवी अग्रवाल यांनी ही सीरिज बनवली असून ग्राफीक इंडियाने त्याची निर्मिती केली आहे. 29 जानेवारी 2021 रोजी या सीरिजचा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता. पहिल्या सिझनमध्ये एकूण 13 एपिसोड्स होते. त्यानंतर त्याच वर्षी 27 जुलै रोजी आणखी 13 एपिसोड्सचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.