
अभिनेत्रीचं जीवन सर्वांना फार आकर्षक वाटतं. महागडे कपडे, आलिशान गाड्या, रॉयल लाईफस्टाईल मागे अभिनेत्री अनेक संकटांचा सामना करत असतात. प्रोफेशनल आयुष्यात अभिनेत्री यशाच्या शिखरावर असल्यातरी, अनेक अभिनेत्री घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरतात. असं काही टीव्ही विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं. ‘नव्या’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सौम्या सेठ हिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला. लग्नानंतर अभिनेत्रीवर सासरच्या मंडळींना अत्याचार सुरु केले. मारहाण केल्यामुळे अभिनेत्रीच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या.
सौम्या जेव्हा स्वतःला आरशात पाहायची तेव्हा स्वतःची अवस्थापासून अभिनेत्री पूर्णपणे खचली होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सौम्या सेठ हिने लग्नानंतर अत्याचारी नवऱ्याने केलेल्या गैरवर्तनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
सासरच्या मंडळींकडून अत्याचार होत असताना सौम्या गरोदर राहिली. प्रेग्नेंट असल्यामुळे सौम्याने लग्न टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र कौटुंबिक हिंसाचारामुळे तिचं जगणं कठीण झालं होतं. अनेकवेळा मरण्याचा विचारही अभिनेत्रीच्या मनात यायचा, पण गरोदर असल्यामुळे सौम्या मरण्याचा विचारही करू शकत नव्हती.
अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, जखमी अवस्थेत ती कित्येक दिवस उपाशी देखील असायची… सौम्याला तिच्या पोटात असलेल्या बाळाला गमवायचं नव्हत म्हणून अभिनेत्री सर्वकाही सहन करत राहिली. अखेर रात्र झाल्यानंतर जसा दिवस उजाडतो, त्याच प्रमाणे सौम्याच्या आयुष्यात तिच्या मुलाची एन्ट्री झाली आणि अभिनेत्रीच्या आयुष्यात चांगले दिवस आले.
अत्याचारी नवऱ्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘मुलगा आयडेनचं माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी फार लकी ठरलं. 2019 मध्ये माझी एका वाईट नात्यातून सुटका झाली. आता मी माझं आयुष्य आनंदाने जगत आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं. ‘नव्या’ फेम सौम्या सेठचं पहिले लग्न अरुण कपूरसोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने डिसेंबर 2024 मध्ये दुसरं लग्न केलं. सौम्याच्या दुसऱ्या पतीसोबत कायम फोटो पोस्ट करत असते.