Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेत जया बच्चन यांचा संताप, ‘या’ कारणामुळे सरकारवर गळचेपी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Jaya Bachchan: असंख्य लोकांसाठी राज्यसभेत जया बच्चन यांनी उठवला आवाज, संताप व्यक्त करत सरकारवर गळचेपी केल्याचा आरोप, काय आहे कारण? जया बच्चन कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

राज्यसभेत जया बच्चन यांचा संताप, 'या' कारणामुळे सरकारवर गळचेपी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Feb 12, 2025 | 1:12 PM

अभिनेत्री आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी राज्यसभेत दमदार भाषण दिली आणि भारतील सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केली. जया बच्चन यांनी यावेळी भारतीय सरकारवर गंभीर आरोप केले आहे. सरकारचं फिल्म इंडस्ट्रीकडे लक्ष नसल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं. ‘सरकारचं लक्ष नसल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीची हत्या होत आहे… सरकारने दया करुन इंडस्ट्रीची गळचेपी करण थांबवावं…’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या. शिवाय नुकतात सादर झालेल्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला आहे.

नुकताच दिलेल्या भाषणात जया बच्चन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘यावेळी बजेटमध्ये फिल्म इंडस्ट्रीसाठी कोणतीच तरतूद नाही. फिल्म इंडस्ट्रीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सिंगल स्क्रिन थिएटर्सची हत्या होत आहे आणि एक दिवस त्यांना टाळे लागतील…’

जया बच्चन म्हणाल्या, यापूर्वीच्या सरकारने अशाच चुका केल्या होत्या पण यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज जीएसटीची गोष्ट बाजूला राहूद्या… सर्व सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद होत आहेत. प्रेक्षकांनी देखील थिएटर्सकडे पाठ फिरवली आहे. कारण सर्व गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.’

हे सुद्धा वाचा

‘सरकारने सादर केलेलं बजेट पाहून फिल्म इंडस्ट्रीकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. इंडस्ट्रीमध्ये एका दिवसाच्या मजूरीवर काम करणारे देखील अनेक लोक आहेत. सिनेमे देशाला जोडून ठेवतात, एकत्र आणतात… असं असताना सरकारने इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष केलं आहे.’

पुढे जया बच्चन म्हणाल्या, ‘आज याठिकाणी फिल्म इंडस्ट्रिच्या वतीने बोलत आहे. त्यांच्याकडून विनंती करत आहे. कृपा करुन इंडस्ट्रीवर दया करा आणि इंडस्ट्रीला वाचव… ज्या प्रकारे बजट सादर झालं आहे, ते पाहिल्यानंतर इंडस्ट्री नष्ट होईल असं दिसत आहे. इंडस्ट्रीला कायम लक्ष्य केलं जातं….’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या आहेत.

सांगायचं झालं तर, जया बच्चन कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर जया बच्चन स्वतःचं परखड मत मांडत असतात. ज्यामुळे जया बच्चन यांच्यावर टीका देखील होते. शिवाय  त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.