ओटीटीवर 9.8 रेटिंगच्या वेब सीरिजचा दबदबा; एपिसोड्स पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवू शकणार नाही फोन

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या वेब सीरिजला जगातील सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. या सीरिजचा पहिला सिझन 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

ओटीटीवर 9.8 रेटिंगच्या वेब सीरिजचा दबदबा; एपिसोड्स पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवू शकणार नाही फोन
वेब सीरिज
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 19, 2026 | 10:01 AM

टीव्हीएफच्या वेब सीरिजना ओटीटीवर प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. ‘पर्मनंट रुममेट्स’, ‘पंचायत’ यांसारख्या टीव्हीएफच्या वेब सीरिजचा ओटीटीवर कायम दबदबा राहिला आहे. आता आणखी एका वेब सीरिजला आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही वर्षांपूर्वी या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ओटीटीवर ही सीरिज ‘मस्ट वॉच’ बनली आहे. या सीरिजचं नाव आहे ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन 2’ (Sapne Vs Everyone 2). अंबरीश वर्मा यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून याची दमदार कथासुद्धा त्यांनीच लिहिली आहे.

‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’चा पहिला सिझन 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचे पाच एपिसोड्स होते. या पहिल्या सिझनलाही प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. आयएमडीबीवर त्याला 10 पैकी 9 पेक्षा जास्त रेटिंग मिळाली होती. आता तीन वर्षांनंतर मे महिन्यात ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’चा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दुसऱ्या सिझनला पहिल्यापेक्षा जास्त यश मिळालं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात या सीरिजला पसंती मिळत आहे. आयएमडीबीवर ही सर्वाधिक रेटिंग मिळवणारी सीरिज बनली आहे. याच्या प्रत्येक एपिसोडला उत्तम रेटिंग मिळाली आहे.

‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’च्या पहिल्या सिझनची रेटिंग

  • पहिला एपिसोड- 9.4 रेटिंग
  • दुसरा एपिसोड- 9.5 रेटिंग
  • तिसरा एपिसोड- 9.6 रेटिंग
  • चौथा एपिसोड- 9.6 रेटिंग
  • पाचवा एपिसोड- 9.7 रेटिंग

दुसऱ्या सिझनचाही धमाका

पहिल्या सिझनपेक्षा अधिक लोकप्रियता आणि यश दुसऱ्या सिझनला मिळालं आहे. या सिझनच्या सर्व एपिसोड्सना दमदार रेटिंग मिळाली आहे.

  • पहिला एपिसोड- 9.7 रेटिंगदुसरा एपिसोड- 9.7 रेटिंग
  • तिसरा एपिसोड- 9.7 रेटिंग
  • चौथा एपिसोड- 9.7 रेटिंग
  • पाचवा एपिसोड- 9.8 रेटिंग

‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ची कथा आपल्या स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या दोन व्यक्तींभोवती फिरते. या दोघांच्या समांतर कथांमधून त्यांचा संघर्ष, कठोर व्यवस्था आणि यशाची मोठी किंमत यांसारख्या गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. यामध्ये परमवीर सिंह, अंबरीश वर्मा, विजयंत कोहली, अभिषेक चौहान आणि किरणदीप कौर यांच्या भूमिका आहेत.

Follow Us