AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 एपिसोड्सची वेब सीरिज प्रदर्शित होताच ट्रेंडिंगमध्ये; पहिल्या सिझनला तर 9.2 रेटिंग

पंचायत, एस्पिरेंट्स, कोटा फॅक्ट्री, गुल्लक यांसारख्या एकापेक्षा एक दमदार वेब सीरिजची निर्मिती करणाऱ्या टीव्हीएफने या सीरिजची निर्मिती केली आहे. याच्या पहिल्या सिझनला आयएमडीबीवर 9.2 इतकी तगडी रेटिंग मिळाली होती.

| Updated on: May 03, 2026 | 10:40 AM
Share
ओटीटीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली एक वेब सीरिज आता सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. भावना आणि दमदार परफॉर्मन्सने भरलेली पाच एपिसोड्सची ही सीरिज ओटीटीवर येताच टॉप 10 ट्रेंडिंगच्या यादीत पोहोचली आहे. या निर्दयी जगात स्वप्न पाहण्याच्या शिकवता न येणाऱ्या कलेभोवती याची कथा फिरकते. देव आणि पृथ्वीवरील देव या चर्चेला ही सीरिज आणखी पुढे नेते.

1 / 5
ही कथा दोन मित्रांची आहे, ज्यापैकी एक रियल इस्टेटच्या विश्वातील 'सेल्सचा देव' मानला जातो. त्याला त्याच्या कारस्थानी आणि चलाख काकाचा सूड घ्यायचा आहे. तर दुसरा मित्र मुंबईच्या अत्यंत स्पर्धात्मक चित्रपटसृष्टीत सतत नकार आणि नैतिक तडजोडींना तोंड देत आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करतोय. ही कथा फिल्म इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड करते.

2 / 5
'सपने व्हर्सेस एव्हरीवन 2' असं या वेब सीरिजचं नाव असून 1 मे पासून ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ओटीटीवर येताच ही सीरिज टॉप 10 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होतेय. पाच एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये परमवीर चीमा आणि अंबरीश वर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत.

3 / 5
सत्तासंघर्ष, नकार आणि अनिश्चिततेनं भरलेल्या या धोकादायक मार्गावर प्रवास करताना या दोघांच्या मनात विचार येतो की नशिब पूर्वनिश्चित असतं की जे स्वत:च्या नशिबाची सूत्रे हातात घेण्याचं धाडस करतात, त्यांच्या हातात ते असतं? या दमदार वेब सीरिजचा पहिला भागसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर दुसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

4 / 5
या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आयएमडीबीवर या सीरिजला 10 पैकी 9.2 रेटिंग मिळाली होती. मोस्ट वॉच्ड सीरिजमध्ये समाविष्ट असलेल्या या वेब सीरिजचा नवीन सिझनसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतोय.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी