Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित चित्रपटात अल्लू अर्जुन(Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यासह मल्याळम स्टार फहाद फासिल (Fahad Faasil) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या या गाण्याचे व्हर्जन
समंता
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 2:33 PM

मुंबई : बहुचर्चिच ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग आता प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन(Allu Arjun) सोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यासह मल्याळम स्टार फहाद फासिल (Fahad Faasil) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगूसह तो तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन म्हणजे हिट किंवा हाऊसफुल्ल हे समीकरणच झालंय. अफलातून डान्स आंध्रातल्या युवांना भुरळ पाडतो. ही गाणी ऐकताना मराठीतूनही ते ऐकायला मिळायला हवं होतं, असं आपल्याला अधूनमधून वाटत राहत. विशेष म्हणजे आज चित्रपटाची टीम मुंबईत प्रमोशनसाठी आली होती.

देवी श्री प्रसादचं संगीत
चित्रपटासह यातली गाणीही खूप चर्चेत आहेत. देवी श्री प्रसाद या साऊथ इंडियन म्युझिशियननं याला संगीत. यूट्यूबला ही गाणी ट्रेंडिंगला आहेत. विशेष म्हणजे तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नडमधील गाणीही प्रचंड ऐकली, पाहिली जाताहेत.

हिंदी, तेलुगू ट्रेंडिंग
तेलुगू भाषेतल्या Oo Antava.. Oo Oo Antava (Telugu) या गाण्याला जवळपास 34, 845,317+ एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं ट्रेंडिंगला आहे. इंद्रावती चौहान (Indravathi Chauhan)नं ते गायलंय. तर Oo Bolega Ya Oo Oo Bolega हे हिंदी व्हर्जनमधलं गाणं कनिका कपूर (Kanika Kapoor)नं गायलं. 7, 846, 241+ व्ह्यूज मिळालेत. विशेष म्हणजे, सर्व गाण्यात शब्द वगळता ऐकणाऱ्याला सर्व सारखं वाटतं.

मल्याळम व्हर्जन Oo Chollunno.. Oo Oo Chollunno (Malayalam) गाण्याला 1,234,032+ मिळाले असून ते रम्या नम्बीसननं गायलं. कन्नड व्हर्जन लोकप्रीय तेलुगू गायिका मंगलीच्या आवाजात आहे. याला 3,145,446+ व्ह्यू आहेत.

तमिळ व्हर्जन(Oo Solriya Oo Oo Solriya)ला ही लोक पसंत करीत आहेत. या गाण्याला तमिळमध्ये 6,796,372+ व्हूज आहेत. हे गीत अँड्रिया जर्मियाच्या आवाजात आहे. अँड्रिया ही गायिकाच नसून अॅक्ट्रेस, डान्सर प्रेझेंटरही आहे.

Pushpa The Rise | ‘माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक चित्रपट’, चंदन तस्कीरवर आधारित ‘पुष्पा’वर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया!

Pushpa The Rise | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची जोरदार हवा, साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी बॉलिवूडमध्येही जमवला गल्ला!

Brahmastra : रणबीर कपूरने विचारला असा काही प्रश्न, लाजतच आलिया म्हणाली…