AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pushpa The Rise | ‘माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक चित्रपट’, चंदन तस्कीरवर आधारित ‘पुष्पा’वर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया!

दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी 'पुष्पा: द राइज' (Pushpa The Rise) या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अल्लूचे मत आहे की, ‘पुष्पा’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपट आहे.

Pushpa The Rise | ‘माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक चित्रपट’, चंदन तस्कीरवर आधारित ‘पुष्पा’वर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया!
Pushpa
| Edited By: | Updated on: Dec 15, 2021 | 2:31 PM
Share

मुंबई : दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise) या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अल्लूचे मत आहे की, ‘पुष्पा’ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक चित्रपट आहे.

‘नॅशनल क्रश’ म्हणून प्रसिद्धी मिळवणारी रश्मिका मंदाना आणि फहद फासिल सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा : द राईज’ चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहेत. रिलीजपूर्वी अल्लू अर्जुन त्याच्या टीमसोबत जोरदार प्रमोशन करत आहे. काल टीम पुष्पाने चेन्नईत अल्लू अर्जुनच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.

दणक्यात पार पडली पत्रकार परिषद!

या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत संगीतकार देवी श्री प्रसाद, तमिळ आवृत्तीसाठी संवाद लिहिणारे गीतकार मदन कार्की आणि ‘अन्नात्थे’ फेम दिग्दर्शक शिवा देखी उपस्थित होते. या कार्यक्रमाला लायका प्रॉडक्शनचे निर्माते तमिळ कुमारन, अल्लू बॉबी, कालाईपुली ​​एस थानू आणि आरबी चौधरी यांच्यासह इतरही उपस्थित होते.

हिंदीमध्ये पाहा ट्रेलर

मी चेन्नईचाच : अल्लू अर्जुन

प्रसारमाध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला की, हा चित्रपट तामिळनाडूमध्ये रिलीज होणे हे मला महत्त्वाचे वाटले. विशेष म्हणजे, 2020 मध्ये त्याच्या ‘अला वैकुंतापुरुलु’ या मागील सुपरहिट चित्रपटाने कारकिर्दीत नवीन उंची गाठणाऱ्या अल्लू अर्जुनचा जन्म चेन्नईमध्येच झाला होता आणि तो त्याच्या आयुष्यातील पहिली 20 वर्षे चेन्नईमध्ये राहिला होता.

‘अला वैकुंतापुरुलु’ ठरला सुपरहिट!

अल्लू अर्जुन म्हणाला, ‘जेव्हा संगीतकार डीएसपी (देवी श्री प्रसाद) आणि इतरांनी हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, हा एखाद्या तमिळ चित्रपटासारखा वाटत आहे. मी हसलो आणि म्हणालो की मी तामिळ माणूस आहे.’  तो पुढे म्हणाला की, त्याचे चित्रपट YouTube वर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भारतीय चित्रपटांच्या यादीत अव्वल असले तरी, त्याचा एक चित्रपट तामिळनाडूमध्ये खूप गाजावा अशी त्याची इच्छा आहे, कारण तामिळनाडू म्हणजे त्याचे दुसरे घर आहे.

चंदन तस्कराविरोधातील लढा

‘पुष्पा द राईज’ या चित्रपटात चंदन तस्करीची कथा दाखवण्यात येणार आहे, ज्याच्या विरोधात अल्लू अर्जुन लढताना दिसणार आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन स्थानिक रहिवासी पुष्पा राजची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अर्जुन एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो लाल चंदनाची तस्करी करतो. या चित्रपटात अर्जुन व्यतिरिक्त फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पुष्पाची व्यक्तिरेखा अत्यंत निर्भय आहे, त्यामुळे तो प्रत्येक समस्येला अतिशय चपखलपणे हाताळतो. त्याचवेळी, चित्रपटातील रश्मिका मंदनाची व्यक्तिरेखा एका स्थानिक मुलीची आहे, जिच्यावर पुष्पा खूप प्रेम करतो.

पहिल्यांदाच दिसणार अल्लू-रश्मिकाची जोडी

‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Rushikesh Wamburkar | कॉमेडीची बुलेट ट्रेननंतर, ‘A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश साकारणार ‘पक्या’ची भूमिका!

Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

Pushpa The Rise | प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा नवा विक्रम!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...