“आमदाराने तिला रिसॉर्टवर बोलावलं अन्..”; आरोप करणाऱ्या नेत्यावर भडकली तृषा कृष्णन

अभिनेत्री तृषा कृष्णनविरोधात केलेलं आक्षेपार्

आमदाराने तिला रिसॉर्टवर बोलावलं अन्..; आरोप करणाऱ्या नेत्यावर भडकली तृषा कृष्णन
Trisha Krishnan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2024 | 10:25 AM

मुंबई : 21 फेब्रुवारी 2024 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या अभिनेता मंसूर अली खानविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. आता तिने एआयएडीएमके (AIADMK) पक्षाचे माजी नेते ए. व्ही. राजू यांच्याविरोधात थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. ए. व्ही. राजू यांनी तृषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याबद्दलची पोस्ट लिहित तृषाने कारवाईचा इशारा दिला आहे.

“केवळ इतरांचं लक्ष वेधण्यासाठी तुच्छ व्यक्तींना वारंवार अत्यंत खालच्या स्तरावर झुकताना पाहणं घृणास्पद आहे. याविरोधात आवश्यक आणि कठोर कारवाई केली जाईल. यापुढे जे काही बोलायचं असेल किंवा कारवाई करायची असेल ते माझ्या लीगल डिपार्टमेंटकडून केलं जाईल”, असं तिने लिहिलंय. तृषाबद्दल ए. व्ही. राजू जे म्हणाले, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ते तृषाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “अभिनेत्रीला एका आमदाराने रिसॉर्टवर बोलावलं होतं, ज्यासाठी तिला मोठी रक्कम देण्यात आली होती”, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरूनच तृषा भडकली आहे.

याआधी ‘लिओ’ चित्रपटात तृषासोबत काम केलेला अभिनेता मंसूर अली खानने तिच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायलासुद्धा दिलं गेलं नाही”, असं तो म्हणाला होता. यानंतर तृषाने त्याच्यासोबत कधीच काम करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

“त्याची ही टिप्पणी स्त्रीविरोधी, अपमानजनक, अत्यंत वाईट आणि तिरस्कार करण्याजोगी आहे. त्याने माझ्यासोबत काम करण्याची स्वप्न पाहत राहावी पण त्याच्यासारख्या बेकार व्यक्तीसोबत मी स्क्रीन शेअर केला नाही यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्या उर्वरित करिअरमध्येही मी त्याच्यासोबत कधी काम करणार नाही. त्याच्यासारखे लोक माणुसकीला वाईट ठरवतात,” असं ती म्हणाली होती.