कानामागून आली आणि सुपरहिट झाली.. 6 कोटीत बनलेल्या फिल्मचा बॉक्स ऑफीसवर कल्ला, कमावला 158 % नफा

Tumbadchi Manjula BO Collection Day 24 : कॉमेडी-हॉरर 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी अभिनित या चित्रपटाने रिलीजच्या 24 दिवसांत ₹15.48 कोटींची विक्रमी कमाई करत 'सुपरहिट'चा दर्जा मिळवला आहे. 2026 मधील हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला असून, आपल्या कमी बजेटमध्येही त्याने मोठे व्यावसायिक यश मिळवले आहे.

कानामागून आली आणि सुपरहिट झाली.. 6 कोटीत बनलेल्या फिल्मचा बॉक्स ऑफीसवर कल्ला, कमावला 158 % नफा
6 कोटीत बनलेल्या चित्रपटाने कमावला 158% नफा
| Updated on: Jun 29, 2026 | 2:58 PM

या वर्ष प्रदर्शित झालेले ‘राजा शिवाजी’ आणि ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर मोठी धमाल केली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत विविध कोरगांवकर यांच्या ‘तुंबाडची मंजुळा’ या कॉमेडी-हॉरर फिल्मनेही चांगली कामगिरी केली आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आणि थिएटर्समध्येही चांगलाच गाजतोय. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 दिवसांतच या चित्रपटाने विक्रमी कमाई केली असून ‘सुपरहिट’चा दर्जा मिळवला आहे. सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी चित्रपट ठरण्याच्या मार्गावर आहे. चला तर ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवर एक नजर टाकूया.

24 दिवसांत तुंबाडची मंजुळाने किती केली कमाई ?

‘तुंबाडची मंजुळा’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत; प्रदर्शनानंतरच्या चौथ्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली असून, त्याच्या कमाईत मोठी वाढ दिसून आली आहे. ‘सॅकनिल्क’च्या (Sacnilk) सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, प्रदर्शनाचा 24 वा दिवस असलेल्या चौथ्या रविवारी या चित्रपटाने 52 लाख रुपयांची कमाई केली. 23 व्या दिवशी—म्हणजेच चौथ्या शनिवारी—या चित्रपटाने 42 लाख रुपयांची कमाई केली. यासह, 24 दिवसांमध्ये या चित्रपटाची भारतातील एकूण निव्वळ कमाई15.48 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला ‘घाबडकुंड’ या दुसऱ्या मराठी चित्रपटाकडून तगडी स्पर्धा मिळत असूनही, या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे.

वर्षातील चौथा मोठा मराठी चित्रपट

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा हा चित्रपट हा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र, तो यापेक्षा वरचे स्थान गाठू शकणार नाही, कारण 28 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे.

2026मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे टॉप 5 मराठी चित्रपट (भारतात नेट कलेक्शन)

राजा शिवाजी : 105.68 कोटी

देऊळ बंद 2 : 72.24 कोटी

क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम: 28 कोटी

तुंबाडची मंजुळा : 15.01 कोटी

अगं अगं सुनबाई! काय म्हणतंय सासूबाई? : 8.97 कोटी

सुपरहिट ठरला ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपट ?

‘तुंबडची मंजुळा’ हा चित्रपट अवघ्या 6 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने 24 दिवसांत15.48 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यातून 9.48 कोटी रुपयांचा रिटर्न मिळीलाय. टक्केवारीत तो तब्बल 158 टक्के आहे. त्यामुळेच हा कॉमेडी-हॉरर चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर सुपर-हिट ठरला आहे.

Follow Us