
Ram Kapoor: छोट्या पडद्यापासून स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता राम कपूर याने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन करणारा राम कपूर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण करत आहे. सध्या ‘मिस्त्री’ या आगामी सीरिजमुळे चर्चेत असलेला राम वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच राम कपूर याच्याविरोधात मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. एका वक्तव्यामुळे राम कपूर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
‘मिस्त्री’च्या प्रदर्शनाला फारसे दिवस शिल्लक नाहीत आणि जिओ हॉटस्टारच्या टीमने राम कपूरला मालिकेच्या प्रमोशनमधून काढून टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट येथे माध्यमांशी बोलताना राम कपूरने काही अश्लील टिप्पण्या केल्या. ‘मिस्त्री’च्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने अश्लील आणि लैंगिक टिप्पण्या केल्या, ज्या तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांना आवडल्या नाहीत. त्याच्या वक्तव्यामुळे, सर्वांना खूप धक्का बसला.
रिपोर्टनुसार, जिओ हॉटस्टारशी संबंधित एका सूत्राने राम कपूरच्या कृतींबद्दल मोठा आणि धक्कादायक खुलासा केला. रामचा आवाज आणि त्याचे विनोद खूपच अव्यावसायिक होते. तो सतत मुलाखती देत होता. एका क्षणी, कामाच्या दबावाचा उल्लेख करताना, त्याने म्हटले, त्याला असं वाटलं की त्याच्यावर ‘गँग रेप’ होत आहे.
रिपोर्टनुसार, राम कपूर एवढंच बोलून शांत बसला नाही. जिओ हॉटस्टार आणि पीआर टीमशी झालेल्या संभाषणादरम्यान त्याने महिलेचा पोशाख आणि कुटुंबाबद्दल अश्लील टिप्पण्याही केल्या. राम कपूरची पोलखोल करत एक महिला म्हणाली, ‘राम कपूरने माझ्या सहकारी महिलेचा ड्रेस पाहीला आणि उंचीकडे इशारा करत म्हणाला, हे कपडे माझं लक्ष विचलित करत आहेत. ‘
जिओ हॉटस्टारच्या आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार, राम कपूरच्या सततच्या अश्लील कमेंट्समुळे आमची टीम हैराण झाली. असं मानलं जातं की रामने एका सहकाऱ्याला असेही सांगितले की, त्याच्या आईने त्या रात्री डोकेदुखीचं नाटक करायला हवं होतं, म्हणजे याचा जन्मच झाला नसता. असं देखील अभिनेत्री म्हणाली.