मोलकरणीने प्रसिद्ध अभिनेत्याला लूटलं… तिला घरातील प्रत्येक कोपरा माहिती असल्याने घडली धक्कादायक घटना
घरात काम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीने अभिनेत्याला पूर्णपणे लूटलं आहे. म्हणून अभिनेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे... सध्या याप्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे...

एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला घरात काम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीने लूटलं आहे. मोलकरणीने अभिनेत्याच्या कपाटातील दागिने आणि रोकड लंपास केली आहे… सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. ज्या अभिनेत्याच्या घरात मोलकरणीने चोरी केली, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता विपुल रॉय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई टीव्ही अभिनेता विपुल रॉय याच्या निवासस्थानी घरफोडीची घटना घडली आहे. खारमध्ये घरगुती मोलकरणीने टीव्ही अभिनेता विपुल रॉय याच्या निवासस्थानी घरफोडी केली आहे.
मोलकरणीने जवळपास 7.10 लाख रोख रक्कम आणि दागिने लंपास केले आहेत. 41 वर्षीय अभिनेते विपुल रॉय याच्या निवासस्थानी चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. खार पोलिसांनी एका घरगुती नोकराविरोधात विदेशी आणि भारतीय चलन, तसेच सोन्या-चांदीचे दागिने, एकूण 7.10 लाख रुपये चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित घटना 6 एप्रिल रोजी घडली आणि 21 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. घरगुती मदतनीस, दिपाली खरवा हिने रोख रक्कम आणि दागिने चोरले. असंही सांगण्यात येत आहे की, अभिनेता परदेशात गेला होता आणि त्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल रॉय खार पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील कलानिकेतन इमारतीच्या 10 व्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतो. अभिनेता अधूनमधून अर्बन कंपनी ॲपद्वारे घरकामासाठी मदतनीसांना बोलावतो. अभिनेत्याने पोलिसांना सांगितल्यानुसार, 6 एप्रिल 2026 रोजी दीपाली संजय खारवा नावाच्या एका महिलेला सफाई आणि अन्या कामांसाठी बोलावलं होतं. याआधी देखील दीपाली अभिनेत्याच्या घरी काम करण्यासाठी आली होती. म्हणून तिला घरातील प्रत्येक कोपरा माहिती होता… 6 एप्रिल रोजी दीपाली सकाळी 9.45 वा. घरकाम करण्यासाठी पोहोचली होती आणि 15 मिनिटांत काम करून निघाली.
विपुल रॉय याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने अनेक मालिका आणि शोमध्ये काम केलं आहे. एफआईआर, भोला पंडित यांसारख्या मालिकांमध्ये देखील अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.