AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs AFGA : टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार?

India A vs Afghanistan A Preview : तिलक वर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने विजयी सलामीनंतर सलग 2 सामने गमावले. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतासाठी अफगाणिस्तान विरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आणि करो या मरो असा आहे.

INDA vs AFGA : टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार?
India A Tilak VarmaImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 17, 2026 | 4:04 AM
Share

ट्राय ए 2026 सीरिजमधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमेनसामने असणार आहेत. भारतीय संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. तर अफगाणिस्तानचा हा तिसरा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही या मालिकेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. भारताने या मालिकेत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर भारताला सलग 2 सामने गमवावे लागले. त्यामुळे आता टीम इंडियाला अंतिम फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात जिंकावं लागणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे. या सामन्याबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना बुधवारी 17 जून रोजी होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना रंगिरी दांबुला स्टेडियम इथे होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध अफगाणिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

पहिल्या 3 सामन्यांत काय झालं?

भारताने 9 जून रोजी श्रीलंकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावत 2 गुण कमावले. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेने जोरदार लढा दिला. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी चिवट बॉलिंग केली आणि श्रीलंकेला 7 बॉलआधी गुंडाळलं. भारताने श्रीलंकेला 269 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे 8 धावांनी सामना जिंकला.

अफगाणिस्तान विरुद्ध पराभव

भारताने अफगाणिस्तान विरुद्ध 49 ओव्हरच्या सामन्यात 349 धावा केल्या. मात्र पावसाने पुन्हा खोडा घातला. अफगाणिस्तानने पावसामुळे खेळ थांबला तोवर 25.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 177 रन्स केल्या होत्या. तसेच डीएलएसनुसार निकाल लावण्यात आला त्या क्षणी अफगाणिस्तान टीम इंडियापेक्षा 4 धावांनी पुढे होती. अशाप्रकारे अफगाणिस्तानने डीएलएसनुसार 4 धावांनी सामना जिंकला.

श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव

भारताला 15 जूनला श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावं लागलं. श्रीलंकेने यासह पहिल्या पराभवाची परतफेड केली. भारताचं या पराभवामुळे अंतिम फेरीच्या हिशोबाने टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे आता ब्लु आर्मी अफगाणिस्तान विरुद्ध सामना जिंकून आपलं आव्हान कायम राखणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...