AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीने घरात घेण्यास केली मनाई, विदेशात अभिनेत्री अडचणीत, थेट पोलिस स्टेशन गाठत…

टीव्ही अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. दलजीत काैर हिने काही महिन्यांपूर्वीच केन्याचा बिझनेसमॅनसोबत लग्न केले. मात्र, अभिनेत्रीचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाहीये. पतीवर अत्यंत गंभीर आरोप करतानाही दलजीत दिसली.

पतीने घरात घेण्यास केली मनाई, विदेशात अभिनेत्री अडचणीत, थेट पोलिस स्टेशन गाठत...
Daljit Kaur
| Updated on: Aug 30, 2024 | 12:37 PM
Share

अभिनेत्री दलजीत काैर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दलजीत काैर हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. हेच नाही तर दलजीत ही टीव्ही मालिकांमध्येही धमाका करताना दिसली. दलजीत काैर हिने शालिन भनोट याच्यासोबत लग्न केले होते. शालिन आणि दलजीतचा एक मुलगा देखील आहे. मात्र, यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. दलजीत काैर हिने दहा महिन्यांच्या अगोदर केन्याचा बेस्ट बिझनेसमॅन निखिल पटेल याच्यासोबत लग्न केले. काही वर्ष हे एकमेकांच्या संपर्कात होते. निखिल पटेल याचे देखील दलजीतसोबतचे दुसरे लग्न होते. भारतात अत्यंत खास पद्धतीने यांचा विवाहसोहळा हा पार पडला.

लग्न होऊन काही महिने पूर्ण होताच दलजीत काैर ही केन्यावरून भारतात परतली. हेच नाही तर दलजीत काैर हिने पती निखिल पटेल याच्यावर अत्यंत गंभीर आरोपही केले. आता दलजीत काैर आणि निखिल पटेल यांचा वाद थेट कोर्टात पोहोचलाय. दलजीत काैर हिच्या आरोपांनंतर निखिल पटेल यानेही तिच्यावर काही आरोप केले.

आता नुकताच दलजीत काैर ही केन्यामध्ये पोहोचली. यावेळी दलजीत ही निखिल पटेल याच्या घरी तिचे राहिलेले सामान घेण्यासाठी गेली असता तिला खालीच सुरक्षारक्षकांकडून रोखण्यात आले. तिला वरती जाण्यास मनाई असल्याचे सांगितले गेले. तिथे बराच गोंधळ झाला आणि दलजीत काैर ही थेट केन्याच्या पोलिस ठाण्यात जाऊन पोहोचली.

यावेळी दलजीत काैर हिने निखिल पटेलच्या विरोधात तक्रार दिलेली असल्याचेही सांगितले जातंय. ज्यावेळी सुरक्षारक्षक हे दलजीत काैरला आतमध्ये सोडत नव्हते, त्यावेळी निखिल पटेल हा गाडीमध्ये बसून सर्व तमाशा बघत असल्याचे देखील दलजीत काैर हिने म्हटले आहे.  निखिल पटेल याच्याकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते की, दलजीत काैर हिने तिचे साहित्य घेऊन जावे नाही तर ते दान केले जाईल.

यावर कोर्टाने म्हटले होते की, दलजीत काैरचे हे सामान तिच्या लग्नाचे असल्याने निखिल हे कोणालाही दान करू शकत नाही. त्यावर निखिल पटेल याच्या वकिलाने म्हटले की, त्यांचे लग्नच झाले नाही तर लग्नाचे सामान कसे? पोलिस स्टेशनमध्ये दलजीत काैर हिने तिच्या आणि निखिलच्या लग्नाचे फोटो दाखवल्याचे देखील सांगितले जाते.

Follow Us
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!