
Mahhi Vij Reaction : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री माही विज ही प्रचंड चर्चेत आहे. खरं तर, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे 4 जानेवारी रोजी माही आणि जय भानुशाली यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. लग्नानंतर 15 वर्षांनी हे दोघे वेगळे झाले असून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र घटस्फोटाच्या घोषणेनंतर माहीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा जवळचा मित्र नदीम कुरेशीसोबतच फोटो टाकत एक पोस्ट शेअर केली आहे.
पण त्यांचा एकत्रित फोटो आणि आय लव्ह यू ही कमेंट पाहून लोकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत त्यांच्या नात्याबददल उलट सुलट चर्चा सुरू केली. या कमेंट्समुळे माही विज देखील खूप संतापली असून तिने आता एक व्हिडीओ पोस्ट लोकांना चांगलच ऐकवलं आहे.
घटस्फोटाच्या घोषणेपासून, जय भानुशाली आणि माही विज यांनी केलेली कोणतीही पोस्ट चर्चेला उधाण आणते. त्यातच काल जेव्हा अभिनेत्रीने नदीम कुरेशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली तेव्हाही नवा वाद निर्माण झाला. या फोटोसोबत माहीने भलीमोठी कॅप्शन देत त्याला आय लव्ह यू देखील म्हटलं. मात्र या ओळीने विविध चर्चांना उधाण आले. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि जय भानुशाली यांनी या कमेंटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत, पण आता माहीनेही एका व्हिडिओद्वारे तिचा राग व्यक्त केला आहे.
शेअर केला व्हिडीओ
माहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली आहे की, अनेकांनी मला याबद्दल बोलू नका असा सल्ला दिला , परंतु आम्ही दोघांनी एकमेकांचा आदर करत ज्या प्रकारे घटस्फोट घेतला आहे, ते काही लोकं पचवू शकत नाहीत, असं दिसतंय. तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सी पाहिजे, वाद पाहिजे, घाण पाहिजे. अभिनेत्री पुढे म्हणाली, “नदीम माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि तारा त्याला सहा वर्षांपासून अब्बा म्हणते. हा माझा आणि जयचा निर्णय होता की ती त्याला अब्बा म्हणेल. पण तुम्ही अब्बा या शब्दाचा अपमान केलात” असं तिने ट्रोलर्सना ऐकवलं.
चांगलीच भडकली माही
माही पुढे म्हणाली की, एखादी व्यक्ती एखाद्या फेजमधून जात असते, काही अनुभव येत असतो. पण तुम्ही लोक कर्माला घाबरत नाही. , “मी तुम्हा सर्वांना माझ्या गोष्टी खराब करू देणार नाही” असं ती राग जाहीर करत म्हणाली. तिने सध्या तिच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केला आहे. माहीच्या आधी अंकिता लोखंडेनेही अशा अफवांवर नाराजी व्यक्त केली होती आणि एक पोस्ट शेअर केली होती. तर माहीचा पूर्व पती जय याने ही पोस्ट री-शेअर करत प्रत्येक गोष्टीशी सहमत असल्याचं सांगितलं होतं.