
मनोरंजन इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करणे सोपे नाही. यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि अनेक सेलिब्रिटींनी आपले स्थानही निर्माण केले आहे. अनेक वर्षे मेहनत करून इंडस्ट्रीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. पण काही सेलेब्स असेही आहेत जे प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता झगमगाटाच्या दुनियेपासून लांब गेले आहेत. त्यांनी प्रसिद्धी आणि यशापासून दूर आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. अशीच एक अभिनेत्री नुपूर अलंकारही आहे. तिने आता अभिनयाच्या जगाला रामराम ठोकत सन्यास घेतला आहे. अनेक वर्षे छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करून घेतलेल्या नुपूरने आता आपले सर्वकाही सोडून साध्वी बनली आहे. तिचे राहणीमान पूर्णपणे बदलले आहे.
१५० पेक्षा जास्त शोजमध्ये केले काम
नुपूरने अनेक वर्षे टीव्ही इंडस्ट्रीत काम केले आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये १५० पेक्षा जास्त टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. २०२२ मध्ये नुपूरने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्या पूर्णपणे सन्यासिनी बनल्या आहेत. आता त्यांचे पूर्ण लक्ष आध्यात्माकडे आहे. गुरु शंभू शरण झा यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संन्यास घेतला आणि आता त्या ना छोट्या पडद्यावर दिसतात, ना कोणत्या सामाजिक कार्यक्रमात.
कसे बदलले जीवन
नुपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, आता माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या ड्राम्यासाठी जागा नाही. ही इंडस्ट्री दिखाव्याने भरलेली आहे. आता मी यापासून दूर राहून खरी शांती अनुभवते. नुपूर पूर्णपणे साधनेत बुडाल्या आहेत. त्या भिक्षा मागून आपले जीवन जगतायेच. त्या भिक्षा मागून जेवण करतात, जमिनीवर झोपतात आणि दिवसात फक्त एकदाच जेवण घेतात. नुपूरच्या पतीनेही त्यांच्या सन्यासिनी होण्याच्या निर्णयाचा आदर केला होता आणि त्यांना लग्नाच्या बंधनातून मुक्त केले होते.