IMDb रेटिंग 8.5, एकदम सिंपल सीरिज, ज्यामध्ये प्रत्येक भागात मनोरंजन, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
ना मोठे बजेट, ना कोणताही मोठा सुपरस्टार, या फॅमिली ड्रामा सिरीजमध्ये कॉमेडीसोबत शिकायला मिळतात अनेक गोष्टी, फ्रीमध्ये बघत आहेत लोक.

जर तुम्हाला गुल्लक, पंचायत आणि Aspirants सारख्या साध्या, वास्तववादी कथा आवडत असतील तर तुमच्यासाठी एक नवी आणि तितकीच मनाला भिडणारी वेब सिरीज समोर आली आहे. ही सिरीज एक फॅमिली ड्रामा असून, तुम्ही ती संपूर्ण कुटुंबासोबत सहज पाहू शकता. या सिरीजमध्ये ना मोठे बजेट आहे, ना मोठे कलाकार. पण सामान्य माणसांच्या आयुष्यातील खऱ्या भावना, संघर्ष आणि नात्यांची सुंदर मांडणी या सीरिजमध्ये आहे.
TVF ने ही सिरीज तयार केली आहे आणि ती YouTube वर मोफत उपलब्ध आहे. सध्या या सिरीजचे पाच एपिसोड रिलीज झाले असून, प्रेक्षकांना ते एकत्र पाहता येतात. प्रत्येक एपिसोड सुमारे 20 ते 30 मिनिटांचा आहे.
IMDb रेटिंग जबरदस्त
या सिरीजची कथा एका छोट्या शहरातील किराणा दुकानाभोवती फिरते. मध्यमवर्गीय कुटुंबाचे दैनंदिन जीवन, त्यांचे संघर्ष, स्वप्नं, भांडणं आणि प्रेम यांचं अत्यंत वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळतं. IMDb वर या सिरीजला 8.5 रेटिंग मिळालं आहे.
या सिरीजमध्ये श्रीकांत वर्मा, गरिमा विक्रांत सिंह, हेमंत मिश्रा, बैशाली सिन्हा आणि अभिषेक झा यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कथेत गजानंद नावाचा एक व्यक्ती आपल्या घरातूनच किराणा दुकान चालवतो. हे दुकान त्याची ओळख, त्याचं स्वप्न आणि त्याचं आयुष्य आहे. मात्र, आधुनिक काळात सुपरमार्केट्स आणि ऑनलाइन डिलिव्हरी अॅप्समुळे त्याच्या व्यवसायाला मोठं आव्हान निर्माण होतं.
पारंपरिक विचार आणि मुलांची आधुनिक कल्पना
घरातच दुकान असल्यामुळे त्याची पत्नी आणि मुलंही या व्यवसायात सहभागी होतात. वडिलांचे पारंपरिक विचार आणि मुलांची आधुनिक कल्पना यांच्यातील संघर्ष ही या सिरीजची खासियत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमधून मोठ्या भावना दाखवल्या आहेत. जसे की बनावट नोट, ग्राहकांची गद्दारी, कांद्याच्या वाढत्या किमती, दुकानात चोरी इत्यादी. या सगळ्या आव्हानांनंतरही कुटुंब हार मानत नाही हेच या सिरीजचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे.
‘फॅमिली किराणा स्टोअर’ ही फक्त व्यवसायाची कथा नाही तर नातेसंबंध जपण्याची, कुटुंब एकत्र ठेवण्याची आणि छोट्या-छोट्या आनंदांचा शोध घेण्याची गोष्ट आहे. TVF च्या इतर सिरीजप्रमाणेच यातही अभिनय अतिशय नैसर्गिक आणि प्रभावी आहे. ही सिरीज हलक्या-फुलक्या विनोदासोबतच भावनिक स्पर्श देणारी आहे. जी प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वतःची वाटेल.