AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 50 व्या वर्षी ट्विंकलने मिळवली ग्रॅज्युएशन डिग्री; अक्षय कुमारकडून भावूक पोस्ट

ट्विंकलने आजवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. 'मिसेस फनीबोन्स', 'पजामास आर फरगिव्हिंग' आणि 'द लेजंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' अशी तिच्या पुस्तकांची नावं आहेत. अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. त्यांना 21 वर्षांचा मुलगा आरव आणि 11 वर्षांची मुलगी नितारा आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी ट्विंकलने मिळवली ग्रॅज्युएशन डिग्री; अक्षय कुमारकडून भावूक पोस्ट
Akshay Kumar and Twinkle KhannaImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 17, 2024 | 8:34 AM
Share

मुंबई : 17 जानेवारी 2024 | अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम केला. त्यानंतर ती लेखनाकडे वळली. ट्विंकल तिच्या लेखनातील उपरोधिक शैलीसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरही अनेकदा ती तिच्या पोस्टमुळे चर्चेत येते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ट्विंकलने आपलं अधुरं स्वप्न पूर्ण केलं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी तिने ग्रॅज्युएशनची पदवी संपादित केली आहे. अक्षय कुमारने पत्नीसोबतचा फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्याने ट्विंकलचं तोंडभरून कौतुक केलं. या फोटोमध्ये ट्विंकलच्या डोक्यावर ग्रॅज्युएशन कॅप पहायला मिळतेय.

अक्षय कुमारची पोस्ट-

‘दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला म्हणाली होतीस की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. पण जेव्हा मी तुला त्यासाठी मेहनत घेताना पाहिलं तेव्हा मला याची जाणीव झाली की मी एका सुपरवुमनशी लग्न केलं आहे. तू घर, करिअर आणि आपल्या मुलांसोबतच एका विद्यार्थिनीच्या आयुष्यालाही उत्तमप्रकारे सांभाळलंस. आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी मला असं वाटतंय की जर मी आणखी थोडा शिकलो असतो तर मला पुरेसे शब्द सुचले असते आणि मी तुला सांगू शकलो असतो की मला तुझ्यावर किती अभिमान आहे. टीना.. खूप खूप शुभेच्छा आणि आय लव्ह यू’, अशा शब्दांत अक्षय कुमारने भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकलनेही कमेंट केली आहे. ‘मी खूप नशीबवान आहे की मला असा जोडीदार भेटला जो मला उंच उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करतो. पण मी पडले तरी तो मला उचलण्यासाठी नेहमीच तयार असतो आणि मी बऱ्याच वेळा पडते, नाही का? उद्या 23 वर्षे पूर्ण होणार आहेत’, असं तिने म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ट्विंकलनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘..अन् हा आहे माझा ग्रॅज्युएशन दिवस. गोल्डस्मिथ्समध्ये माझा पहिला दिवस जणू मला कालच्याच किंवा बऱ्याच वर्षांपूर्वीचा दिवस असल्यासारखं वाटतंय. ऊबदार ऊन, सुंदर साडी आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या कुटुंबीयांनी या दिवसाला आणखी खास बनवलं आहे. ज्याची मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. आयुष्यात एक असा टप्पा येतो जेव्हा प्रगती करण्याचा सर्वांत सोपा मार्ग हा सरळ असल्यासारखा वाटतो. पण आपण स्वत:ला आणखी पुढे ढकललं पाहिजे, कारण प्रगती करण्याचे असंख्य दुसरे मार्ग आहेत’, असं तिने लिहिलं आहे.

2022 मध्ये ट्विंकलने गोल्डस्मिथ्स या लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये फिक्शन राइटिंगमध्ये मास्टर्ससाठी अर्ज केला होता. त्यावेळी अक्षयने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “लोक त्यांच्या मुलांना शाळा-कॉलेजमध्ये सोडायला जातात. पण मी माझ्या पत्नीला लंडनच्या युनिव्हर्सिटीला सोडायला जातोय. कारण तिला पदवी संपादित करायची आहे.”

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…