AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडीलच द्यायचे लेकीला अनेक बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, आज ‘ती’ श्रीमंत अभिनेत्याची पत्नी

Love Life : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला वडीलच द्यायचे अनेक बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, कारण..., आज अभिनेत्री आहे लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेत्याची पत्नी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

वडीलच द्यायचे लेकीला अनेक बॉयफ्रेंड ठेवण्याचा सल्ला, आज 'ती' श्रीमंत अभिनेत्याची पत्नी
| Updated on: Dec 29, 2023 | 1:17 PM
Share

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये कायम बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट इत्यादी गोष्टी होत असतात आणि सोशल मीडियावर, चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. अता देखील एका अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे. जिच्या वडिलांनी लेकीला चार, पाच मुलांना एकाच वेळी डेट करण्याचा सल्ला दिला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ट्विंकल खन्ना आहे. आज ट्विंकल खन्ना आणि तिचे वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस आहे. राजेश खन्नाप्रमाणेच त्यांच्या मुलीनेही अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. पण काही वर्षांपूर्वी ट्विंकलने अभिनयाचा निरोप घेतला. आता ट्विंकल लेखीका म्हणून कार्यरत आहे. एवढंच नाही तर ट्विंकल अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका देखील सर्वांसमोर मांडत असते.

ट्विंकलने एकदा खुलासा केला होता की तिच्या वडिलांनी तिला डेटिंगचा सल्ला दिला होता. राजेश खन्ना यांनी मुलीच्या वाट्याला दुःख यायला नको, म्हणून रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला होता. ट्विंकल खन्ना म्हणाली, ‘वडील मला म्हणाले होते, एका वेळी चार बॉयफ्रेंड ठेव म्हणजे तुला कधी दुःख होणार नाही.’ वाढदिवस असल्यामुळे सध्या सर्वत्र ट्विंकल खन्ना आणि राजेश खन्ना यांची चर्चा रंगली आहे.

ट्विंकल खन्ना हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ट्विंकल हिने अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केलं. अक्षय कुमार आणि ट्विंकल खान्ना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ट्विंकल कायम कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

पत्नीचा वाढदिवस असल्यामुळे अक्षय कुमार याने देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अक्षय एक व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, ‘तुझ्या विनोदाने आमच्या आयुष्यात इतकी वर्षे जोडल्याबद्दल धन्यवाद. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… टिन’ अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

ट्विंकल खन्ना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ट्विंकल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ट्विंकल हिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विंकल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.