
बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही फिल्मी दुनियेशी संबधीत वातावरण असलेल्या घरातून येते. तिची आई एक उत्तम अभिनेत्री आहे. तर काजोलचे वडील शोमू मुखर्जी, हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. ते मुखर्जी कुटुंबातील आहेत, ज्यांचे अनेक पिढ्या सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. तसेच काजोल देखील आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोलने तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
शोमू मुखर्जी आणि सलमान खान कुटुंबाचे होते फार जवळचे संबंध
पण हे फार कमी जणांना माहित असले की सलमान खानचे तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे काजोलच्या वडिलांशी फार जवळचे संबंध होते. ते नेहमी सलमानच्या घरी जायचे. मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी कायमच सलमान खानच्या कुटुंबासोबत ठेवले. त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच आठवणी खान कुटुंबासोबत आजही आहे. त्यातील एक आठवण सलमानच्या आजही लक्षात आहे. त्याने ती एका कार्यक्रमात आवर्जून सांगितलं आहे.
शोमू मुखर्जी यांनी एकदा सलमानच्या घरी असताना सलमानकडे एक गोष्ट फार हट्टाने मागितली होती आणि त्याच्या दोन दिवसांनीच त्यांचं निधन झालं. त्याची आठवण सलमान खानला आजही आहे.
काजोलच्या वडिलांनी ही मागणी केली होती
काजोल आणि ट्विंकल खन्नाचा लोकप्रिय शो “टू मच” मध्ये सलमान खान आणि आमिर खान गेस्ट म्हणून आले होते तेव्हा काजोल आणि सलमान खानने शोमी मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी काजोलने स्वत: देखील याबद्दल सांगितले. शो दरम्यान, सलमान खानने काजोलचे वडील शोमूसोबत घालवलेल्या वेळेबद्दलचा किस्सा सांगितला.
कोजोलच्या वडिलांच्या जवळचा होता.
सलमान म्हणाला, “काजोलचे वडील आणि मी खूप जवळचे होतो. ते आठवड्यातून दोनदा घरी यायचे. ते त्यांच्या मृत्यूच्या फक्त दोन दिवस माझ्या घरी आले होते. तसेच नेहमीप्रमाणे लुंगी घालून बसले होते. तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, ते फार कठीण काळातून जात होते”
शोमूने एक पेय मागितले होते.
तसेच सलमान पुढे म्हणाला, “शोमू दा म्हणाले, प्लिज मला एक ड्रींक दे मित्रा.’ मी त्यांना सांगितले, ‘शोमू दा नाही.’ पण त्यांनी आग्रह धरला आणि म्हणाले, ‘अरे यार माझे दोन ते तीन दिवसच राहिले आहेत. प्लिज मला एक ड्रींक दे.’ तेव्हा मला काय करावं हे कळत नव्हतं. पण मला खूप वाईट वाटलं. शेवटी मी त्याला एक ड्रींक दिली आणि पुढच्या दोन दिवसातच त्यांच्या निधनाची बातमी आली.”ही आठवण सांगताना सलमान खान भावूक झाला होता.
ही जोडी पडद्यावर हिट ठरली.
दरम्यान काजोलने सलमान खानसोबत एक ते दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची ऑन-स्क्रीन जोडी लोकांना फार पसंतीस उतरली होती.