उदय सामंत यांनी केली चित्रपटगृहांच्या मालकांना मोठी विनंती, थेट अयोध्येतील सोहळ्याचे…

सध्या उदय सामंत यांची सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. उदय सामंत यांची ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. उदय सामंत यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून एक मोठी विनंती ही चित्रपटगृहांच्या मालकांना आणि चालकांना केली आहे. तिच आता व्हायरल होतंय.

उदय सामंत यांनी केली चित्रपटगृहांच्या मालकांना मोठी विनंती, थेट अयोध्येतील सोहळ्याचे...
| Updated on: Jan 21, 2024 | 8:18 PM

मुंबई : संपूर्ण अयोध्या नगरी प्रभू रामाच्या स्वागतासाठी सजली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. अनेक लोक हे अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अनेक वस्तू या अयोध्येकडे पाठवल्या गेल्या आहेत. उद्याची सर्वजण वाट पाहत आहेत. बाॅलिवूडचे कलाकार देखील अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. काही खास लोकांनाच सोहळ्याचे निमंत्रण हे देण्यात आलंय. विशेष म्हणजे विविध शहरांमध्येही राम मंदिरात विविध पूजांचे आयोजन केले असून प्रसादाची तयारी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

आता नुकताच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. आता उदय सामंत यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच तूफान व्हायरल होताना दिसतंय. उदय सामंत यांनी एक पोस्ट शेअर करत मोठे आव्हान करत विनंती केली आहे. आता उदय सामंत यांच्या या पोस्टवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहे.

उदय सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 22 जानेवारी हा राम भक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहाच्या चालक आणि मालक यांनी नम्र विनंती आहे की उद्या होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रेक्षपण आपल्या चित्रपटगृहात करून सुद्धा या उत्साहात सामील व्हा.

उदय सावंत यांनी त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून राज्यातील चित्रपटगृहाच्या मालकांना मोठे आव्हानच केले आहे. म्हणजेच काय तर उद्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही थेट अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच पाहून शकता. मात्र, अजूनही चित्रपटगृहांनी अशाप्रकारची घोषणा ही केली नाहीये.

जर उदय सावंत यांच्या आव्हानानंतर चित्रपटगृहांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रेक्षपण केले तर काही वेळासाठी चित्रपटाचे शो बंद राहू शकतात. मात्र, याबद्दल अजून तरी काही स्पष्टता नक्कीच नाहीये. अनेक शहरांच्या मुख्य बाजारपेठेत अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रेक्षपण उद्या केली जाणार आहे.