VIDEO: उदित नारायण गाणे म्हणत जवळ जाण्याचा प्रयत्नात होते, भाग्यश्रीने हुशारीने तिथून पळ काढला

प्रसिद्ध गायक उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान समोर आलेल्या त्यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले  अभिनेत्री भाग्यश्रीसोबतचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते गाणं म्हणत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्नात असतानाच ती हुशारीने तिथून पळ काढते.हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

VIDEO: उदित नारायण गाणे म्हणत जवळ जाण्याचा प्रयत्नात होते, भाग्यश्रीने हुशारीने तिथून पळ काढला
| Updated on: Feb 15, 2025 | 4:14 PM

प्रसिद्ध गायक उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान समोर आलेल्या त्यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहतीच्या ओठांना किस करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.त्यानंतर त्यांचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामुळे उदित नारायण चांगलेच चर्चेत आले आहेत. आताही त्यांना ट्रोल करणं नेटकऱ्यांकडून सुरु आहेच. त्यांची ही कृती कोणाच्याही पचनी पडलेली दिसत नाहीये.

अभिनेत्री भाग्यश्रीसोबतचा व्हिडीओ समोर

दरम्यान त्यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका अभिनेत्रीसोबत गाणं म्हणत आहे. तेव्ही ते तिच्या हाताला स्पर्श करतात आणि गाणे म्हणताना थोडे जवळ येत असतानाचं त्या अभिनेत्री अगदी हुशारीने तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ देखील तुफान व्हारल होत आहे.

उदित नारायण जवळ येत असल्याचं जाणवताच भाग्यश्रीने केलं स्वत:ला दूर

ही अभिनेत्री आहे भाग्यश्री. व्हिडीओमध्ये भाग्यश्री उदित नारायण यांच्यासोबत ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील ‘आजा शाम होने आई’ हे गाणे म्हणताना दिसत आहे. मात्र गाणे गात असताना ते नकळत तिच्या हाताला स्पर्श करतात आणि थोडे जवळ येण्याचा प्रयत्न करत असतानाच भाग्यश्री गाणे म्हणतच अगदी चलाखीने तिथून निघून जाताना दिसते. या व्हिडीओमधील सादरीकरण अगदी कुशलतेने संपवते आणि स्वतःला दूर करते.

नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीचे कौतुक

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भाग्यश्रीचं कौतुक केलं आहे. परिस्थितीला शिष्टाचाराने हाताळल्याबद्दल तिचे कौतुक केलं जात आहे. त्यावेळी ती जे वागली त्याबद्दल नेटकऱ्यांनी तिला हुशार आणि उत्कृष्ट म्हटले आहे. तर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा उदित नारायण यांच्याकडे मोर्चा वळवूण त्यांच्या वागण्याबाबत ट्रोल केलं आहे.

लाइव्ह कॉन्सर्टमधील व्हायरल व्हिडिओमुळे चौकशी सुरू

दरम्यान उदित नारायण यांच्यावर लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र एका मुलाखतीत उदित नारायण यांनी त्यांच्या आरोपांविरुद्ध स्वतःचा बचाव करत म्हटलं होतं “मी बॉलिवूडमध्ये 46 वर्षांपासून आहे आणि माझी प्रतिमा कधीही अशी नव्हती की मी चाहत्यांना जबरदस्तीने किस करेल. खरं तर, जेव्हा माझे चाहते माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतात तेव्हा मी कृतज्ञतेने हात जोडतो. स्टेजवर असताना, मी नतमस्तक होतो, असे वाटते की हा क्षण पुन्हा कधीही येणार नाही.”