Urmila Kothare | “.. तर दुसरं प्रेम शोधायचं”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेचं वक्तव्य चर्चेत

उर्मिला-आदिनाथ मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आणि अगदी दृष्ट लागावी अशीच आहे. 'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा होती.

Urmila Kothare | .. तर दुसरं प्रेम शोधायचं; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेचं वक्तव्य चर्चेत
Urmila and Adinath Kothare
| Updated on: Mar 12, 2023 | 4:37 PM

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ कोठारे. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. उर्मिला किंवा आदिनाथने सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले की त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागतो. ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटासंदर्भात बोलण्यासाठी जेव्हा महेश कोठारे यांनी उर्मिलाला त्यांच्या घरी बोलावलं होतं, तेव्हा आदिनाथ तिला पाहताच क्षणी प्रेमात पडला होता. डिसेंबर 2011 मध्ये या दोघांनी लग्न केलं. त्यांना जिजा ही मुलगी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. या चर्चांमागचं कारणही तसंच होतं. त्यानंतर आता नुकत्याच एका चॅट शोमध्ये उर्मिलाने अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत हजेरी लावली. या शोमध्ये उर्मिलाने प्रेमाबद्दल केलेल्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

घटस्फोटाची चर्चा का सुरू झाली?

आदिनाथचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा त्याच्या प्रमोशनदरम्यान उर्मिला कुठेच त्याच्यासोबत दिसली नव्हती. इतकंच नव्हे तर तिने सोशल मीडियावरही कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. त्याचवेळी उर्मिलाच्या वाढदिवशी आदिनाथनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली नव्हती. इतकंच नव्हेत तर उर्मिलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आदिनाथला अनफॉलो केलं की काय अशीही चर्चा होती.

उर्मिला म्हणाली “.. तर दुसरं प्रेम शोधायचं”

प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ या चॅट शोमध्ये उर्मिलाला प्रेमाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. प्रेम म्हणजे काय असं विचारताच उर्मिला म्हणाली, “प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास”. त्यानंतर पुढे तिला विचारण्यात आलं की, “जर त्याच प्रेमाने जखम दिली तर?” त्यावर काहीसा विचार करून ती म्हणते, “तर मग दुसरं प्रेम शोधायचं.” उर्मिलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आदिनाथ कोठारेची प्रतिक्रिया

आदिनाथने घटस्फोटाच्या चर्चांवर एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली होती. “अशा बातम्या आम्ही वाचतो आणि त्यावर खूप हसतो. आम्ही दोघंही आपापल्या कामांमध्ये व्यग्र आहोत”, असं तो म्हणाला होता.