31 वर्षांपासून उर्मिलाचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय, गाण्यातील डान्स ठरला होता प्रचंड लोकप्रिय

31 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्यामधील अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या डान्सने जिंकली होती सर्वांची मन. आशा भोसले यांच्या आवाजामुळे गाणं ठरलेलं अजरामर. आजही अनेकांचं आवडतं.

31 वर्षांपासून उर्मिलाचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय, गाण्यातील डान्स ठरला होता प्रचंड लोकप्रिय
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 08, 2026 | 2:47 PM

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ या चित्रपटाने 90 च्या दशकातील बॉलिवूडचा रंग, संगीत आणि प्रेमकहाणी सादर करण्याची पद्धतच बदलून टाकली. राम गोपाल वर्मा लिखित-दिग्दर्शित या संगीतमय रोमँटिक-ड्रामा चित्रपटाला आजही हिंदी सिनेमातील कल्ट क्लासिक म्हणून ओळखलं जातं. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता 31 वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘रंगीला’मध्ये आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाची कथा मिली, मुन्ना आणि राज कमल यांच्या त्रिकोणी नात्यावर आधारित होती. उर्मिला मातोंडकरने साकारलेली मिली अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहत असते. तिचा बालपणीचा मित्र मुन्ना म्हणजेच आमिर खान तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो; मात्र तो आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता राज कमल म्हणजेच जॅकी श्रॉफ मिलीला चित्रपटात काम करण्याची संधी देतो. अभिनयाच्या क्षेत्रात आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिली पुढे जाते आणि याच काळात राज कमलही तिच्या साधेपणाकडे आकर्षित होतो. त्यामुळे मुन्ना आणि राज कमल यांच्यातील नातं आणि मिलीच्या आयुष्यातील बदल हे चित्रपटाच्या कथेचं प्रमुख आकर्षण ठरतं.

ए. आर. रहमान यांच्या संगीताची जादू

‘रंगीला’चं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आणि त्यांच्या सुरांनी 90 च्या दशकात अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘रंगीला रे’, ‘तन्हा तन्हा’, ‘याई रे’ आणि ‘हाय रामा’ यांसारखी गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

ए. आर. रहमान यांचा हा पहिल्या मूळ हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. त्यांच्या आधुनिक आणि वेगळ्या संगीतशैलीमुळे ‘रंगीला’च्या गाण्यांना तरुणाईने विशेष पसंती दिली होती.

31 वर्षांनंतरही ‘रंगीला’मधील प्रेमकहाणी, आमिर-उर्मिलाची जोडी, जॅकी श्रॉफचा आकर्षक अंदाज आणि ए. आर. रहमान यांचं संगीत प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. त्यामुळेच ‘रंगीला’ हा केवळ 90 च्या दशकातील हिट चित्रपट नसून, हिंदी सिनेमाच्या संगीत आणि शैलीला नवी दिशा देणारा एक सदाबहार कल्ट सिनेमा म्हणून आजही ओळखला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us