एक पुरुषामुळे उद्ध्वस्त झालं उर्मिला मातोंडकरचं करियर, आज जगतेय असं आयुष्य
Urmila Matondkar Love Life: उर्मिला मातोंडकर आज बॉलिवूडपासून असते दूर, एका पुरुषामुळे अभिनेत्रीचं करीयर झालं उद्ध्वस्त... आज असं जगतेय आयुष्य, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

Urmila Matondkar Love Life: बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोण्या कारणामुळे आजही चर्चेत असते. ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘जुदाई’, ‘इंडियन’, ‘भूत’, ‘आग’, ‘बनारस’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत उर्मिलाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण एकतर्फी प्रेमामुळे उर्मिलाचं करियर संपलं. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, उर्मीलाच्या प्रेमात होते. वर्मा यांनी स्वतःच्या प्रत्येक सिनेमांमध्ये उर्मिला हिला कास्ट केलं होतं.
सांगायचं झालं तर, ‘द्रोही’ सिनेमाच्या एका गाण्याच्या शुटिंग दरम्यान, रामगोपाल वर्मा यांना उर्मिला हिचा डान्स प्रचंड आवडला. त्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी ‘रंगीला’ सिनेमासाठी उर्मिला हिची निवड केली. ‘रंगीला’ हीट झाल्यानंतर रामगोपाल यांच्या प्रत्येक सिनेमात दुसरी कोणती अभिनेत्री नाही तर, फक्त उर्मिला असायची. त्यानंतर दोघांच्या नात्याने आणखी जोर धरला. आजही त्यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.




View this post on Instagram
राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीपर्यंत दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. वर्मा यांच्या पत्नीने अभिनेत्रीच्या कानशिलात देखील लगावल्याचं देखील माहिती समोर आली. रिपोर्टनुसार, रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम करण्यासाठी उर्मिला यांनी अनेक दिग्दर्शकांना नकार दिला.
ज्याचा परिणाम रामगोपाल वर्मा यांच्यासोबत असलेलं नातं संपल्यानंतर अभिनेत्रीला दिसून आला. त्यानंतर उर्मिला हिला सिनेमांसाठी ऑफर येणं बंद झालं. अखेर अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. पण अभिनेत्रीला राजकारणात देखील यश मिळालं नाही.
कोण आहे उर्मिलाचा पती मोहसिन अख्तर मीर
राम गोपल वर्मा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर उर्मिला फार कमी सिनेमांमध्ये दिसली. अखेर 2016 मध्ये अभिनेत्रीने उद्योजक मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत केलं. मोहसिन अख्तर मीर हा कश्मीरी उद्योजक आहे. एवढंच नाही तर, त्याने काही सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे. उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. उर्मिला पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिला आणि मोहसिन यांच्या घटस्फोटाची देखील चर्चा रंगली. पण यावर अभिनेत्रीने कधीच अधिकृत वक्तव्य केलं नाही.