Urvashi Rautela : उचलली जीभ, लावली टाळ्याला.. सैफच्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारताच उर्वशीने जे बोलली, नेटिझन्सनी झाप झाप झापलं

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या 'डाकू महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णासोबत उर्वशी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील गाण्यातील डान्समुळे ती आधीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. आणि आता तिला एका संवदेनशील विषायवर, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचाण्यात आला असता, तिने जे उत्तर दिलं ते ऐकून अनेकांनी डोक्याला हात मारला. काही नेटिझन्स तर तिच्यावर जाम भडकलेत.

Urvashi Rautela : उचलली जीभ, लावली टाळ्याला.. सैफच्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारताच उर्वशीने जे बोलली, नेटिझन्सनी झाप झाप झापलं
उर्वशी रौतेलाच्या विधानाने गदारोळ
| Updated on: Jan 18, 2025 | 9:35 AM

कॉमन सेन्स हा फार कॉमन नसतो… असं एक विधान उपहासाने केलं जातं, पण काही बाबतीत ते खरंही ठरतं. आपण काय, कधी, कुठे, कसं बोलतो याचे बेसिक विधिनिषेध प्रत्येक माणसाने पाळणं अपेक्षित असतं. पण काही वेळा लोक वाट्टेल ते बोलून जातात. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला… अशी म्हण त्यांना तंतोतंत लागू पडते. मग नंतर त्यांना बोलण्याच्या पश्चाताप होता आणि माफी मागत बसावी लागते. अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या बाबतीतही असचं काहीसं झालेलं दिसत आहे. ‘डाकू महाराज’ हा चित्रपट, त्यातील ‘दबीदी दबीदी’ गाण्यावरचा डान्स, सक्सेस पार्टीमधील नंदामुरी बालकृष्ण यांनी केलेल्या स्टेप्स अशा असंख्य मुद्यांवरून उर्वश सध्या रडारवर आहे, ट्रोलर्सच्या निशाण्यावरही ती आली आहे. मात्र तरीही त्यातून ती फारसं काही शिकली नाही असं दिसतंय.

अभिनेता सैफ अली खानवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याने फक्त मुंबईकरच नव्हे बॉलिवूडकरही हादरले आहेत, अनेकांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली. मात्र या अतिशय संवेदनशील मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला असाता उर्वशी रौतेलाने जे उत्तर दिलंय ते ऐकून अनेकांनी डोक्याला हात मारला, कित्येकांचा संताप अनावर झाला असून नेटीझन्स तर तिच्यावर चांगलेच भडकलेत.

काय म्हणाली उर्वशी रौतेला ?

डाकू महाराज चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या उर्वशी रौतेला हिला एका इंटरव्ह्यूदरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला. हा हल्ला अतिशय दुर्दैवी असल्याचं आधी ती म्हणाली, पण त्यानंतर तिने जे उत्तर दिलं ते पूर्णपणे विसंगत होतं, ते ऐकून बरेच लोक भडकलेत. हिला नक्की विचारलं काय आणि ही उत्तर देते काय अशी अवस्था व्यूअर्सची झाली.

सैफसोबत जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. आता डाकू महाराजने 105 कोटींचा टप्पा बॉक्स ऑफीसवर पूर्ण केलाय आणि माझ्या आईने मला हिरेजडीत रोलेक्स घड्याळ गिफ्ट केलं. तर माझ्या वडिलांनी मला हे मिनी वॉच गिफ्ट म्हणून दिलं. त्यानंतर उर्वशीने ते घड्याळ दाखवत फ्लाँट केलं. त्यानंतर ती म्हणाली, की पण हे सगळं घालून आपण बाहेर पडू शकत नाही ना. असुरक्षित वाटू लागलं आहे, की कोणीही येऊन हल्ला करू शकतं. असं विचित्र उत्तर उर्वशीने दिलं.

 

उत्तर ऐकून लोक भडकले

मात्र उर्वशीच्या या वक्तव्यामुळे आणि तिचे घड्याळ फ्लाँट केल्याने ती नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्वशीला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. प्रत्येक गोष्टीचा रोख स्वत:कडे वळवणं, सगळं आपल्याबद्दलच आहे असं वागणं योग्य नसल्याचं अनेक नेटीझन्सचं म्हणणं आहे. इतक्या गंभीर विषयावर अशी विधाने करणे अत्यंत चुकीचे आहे. एक माणूस मरता-मरता वाचलाय, आणि हिला हिच्या दागिन्यांची चिंता लागलीये, असं म्हणत एका युजरने तिला झापलंय. एकंदरच उर्वशीचं हे उत्तर अनेकांना रुचलेलं नसून सोशल मीडियावर ती आणखी ट्रोल होऊ शकते.