Utkarsh Shinde: शिंदे घराण्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, अल्पशा आजाराने जवळच्या व्यक्तीचं निधन

Utkarsh Shinde social media post: मस्त कलंदराच आयुष जगलेला एक मस्त कलाकार..., उत्कर्ष शिंदेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अल्पशा आजाराने जवळच्या व्यक्तीचं निधन, सध्या सर्वत्र उत्कर्ष शिंदे याच्या पोस्टची चर्चा...

Utkarsh Shinde: शिंदे घराण्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, अल्पशा आजाराने जवळच्या व्यक्तीचं निधन
| Updated on: Aug 13, 2024 | 1:13 PM

Utkarsh Shinde: झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे घराण्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन झालंय. उत्कर्ष याने सोळल मीडियावर काकांसोबत काही फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. उत्कर्ष शिंदेचे काका आणि गायक आनंद शिंदे यांचे भाऊ दिनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधन झालंय.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर प्रल्हाद शिंदे यांचं मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर त्यांच्याविषयी भावूक पोस्ट शेअर केलीय. सध्या उत्कर्षची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

मस्त कलंदराच आयुष जगलेला एक मस्त कलाकार… असं म्हणत उत्कर्ष शिंदेने भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला..भावाभावातल प्रेम. स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू.’

 

‘तुम्हा सर्वांनाच्या संस्कारा मुळेच आज हर्षद आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदेघराण्याचा वट्टवृक्ष आणखीन जास्त भव्य समरुद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणा पासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला.दिनू नाना वि विल मिस यू.’ सध्या पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.’