AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच

ज्येष्ठ हिंदी चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचं 77 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी 'फूल और कांटे' या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला लाँच केलं होतं. 'सुहाग', 'हकीकत' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं.

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच
Filmmaker Kuku Kohli
| Updated on: Aug 25, 2026 | 10:24 PM
Share

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली ( Kuku Kohli) यांचं मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण याला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करण्याचे श्रेय कुकू कोहली यांना जातं. कुकू कोहली यांचं मूळ नाव संदेश कोहली असं होतं. गेल्या अनेक दशांकापासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.  ‘हकीकत’, ‘जुल्मी’, ‘सुहाग’, ‘अनारी नं. १’ असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.  मिळालेल्या माहितीनुसार, आज कुकू कोहली यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. अनेक कलाकारांनी शोक व्यक्त करत कोहली यांना श्रद्धांजली वाहिली.

कुकू कोहली यांचे मित्र आणि दिग्दर्शक- निर्माते अशोक पंडीत यांनी कोहली यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘ कुकू यांना कोणताही आजार नव्हता. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्राणज्योत मालवली. ते पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होते,’ असं अशोक पंडीत यांनी नमूद केलं. कुकू कोहली हे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) सरचिटणीसही होते.

कुकू कोहली यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी आहेत. यापूर्वी त्यांचं लग्न रीटा कोहली यांच्याशी झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत. त्यानंतर १९९० साली त्यांनी अभिनेत्री अरुणा इराणी यांच्याशी लग्न केलं.

फूल और कांटेला मिळालं मोठं यश

दिग्दर्शक म्हणून कुकू कोहली यांचा पहिला चित्रपट होता ‘फूल और कांटे’. 1991 साली साली आलेल्या हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या मोठा यशस्वी ठरला. या चित्रपटातून अभिनेता अजय देवगण याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री मधू, अमरीश पुरी, अरुणा इराणी आणि जगदीप यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

यानंतर त्याच वर्षी कुकू कोहली यांनी ‘कोहराम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. 1994 साली प्रदर्शिक झालेल्या‘सुहाग’मध्ये त्यांनी पुन्हा अजय देवगण सोबत काम केलं. या चित्रपटात अक्षय कुमार, करिश्मा कपूर आणि नगमा यांच्याही भूमिका होत्या. ‘सुहाग’ हिट ठरला आणि अजय देवगण व अक्षय कुमार यांची पडद्यावरील जोडी पहिल्यांदा याच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली.

त्याव्यतिरिक्त त्यांनी हकीकत (1995), जुल्मी (1999), अनाडी नं .1 (1999) and ये दिल आशिकाना (2002) हे चित्रपटही दिग्दर्शित केले. तर ‘वो तेरा नाम था’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट 2004 साली मध्ये प्रदर्शित झाला. कुकू कोहली यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अनुभवी दिग्दर्शकाचा प्रवास संपला.

———

Follow Us