Tejaswwini Pandit Mother: ‘पूर्णा’ आजीचे निधन! अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कोसळला दु:खाचा डोंगर

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 69व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्काच बसला आहे.

Tejaswwini Pandit Mother: पूर्णा आजीचे निधन! अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कोसळला दु:खाचा डोंगर
jyoti Chandekar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 16, 2025 | 7:21 PM

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर उर्फ पूर्णा आजी यांचे निधन झाले आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होत. पण आज, त्यांनी वयाच्या 69व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

तेजस्विनी पंडितची आई, ज्योती चांदेकर यांचे आज, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निधन झाले आहे. पुण्यात त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव पौर्णिमा आहे आणि छोट्या मुलीचे नाव तेजस्विनी आहे. ज्योती चांदेकर यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्याती वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

वाचा: कुणी उघड्यावर अंघोळ करतं, कुणी टॉयलेटमध्ये खातं… तर सनी लियोनी दर 15 मिनिटाला… सेलिब्रिटिंच्या या घाणेरड्या सवयी वाचून धक्का बसेल

Jyoti Chandekar

ज्योती चांदेकर यांच्या कामविषयी

ज्योती चांदेकर या अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई. ज्योती चांदेकर यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्या गेली कित्येक वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी गेल्याच वर्षी, वयाच्या 68व्या वर्षी स्वत:ची कार खरेदी केली होती. त्यावेळी तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. ज्योती यांनी गुरु, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाटा, सलाम, सांजपर्व अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना स्टर प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतही काम केले. त्यांची पूर्णा आजी ही भूमिका विशेष गाजली होती. तसेच त्या तू सौभाग्यवती हो, छत्रीवाला या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या.