पतीचं दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असं वागणं अंकिताला झालं नाही सहन; सर्वांसमोर विकीवर भडकली

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पती विकीचं वागणं पाहून अंकिता त्याच्यावर चांगलीच भडकली आहे.

पतीचं दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असं वागणं अंकिताला झालं नाही सहन; सर्वांसमोर विकीवर भडकली
Ankita Lokhande and Vicky Jain
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 17, 2025 | 12:38 PM

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या पतीसोबत ‘बिग बॉस’च्या सतराव्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. या सिझनमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात सतत भांडणं पहायला मिळाली होती. पती-पत्नीचं एकमेकांशी वर्तन पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. नंतर दोघांनीही स्पष्ट केलं की त्यांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, म्हणूनच भांडणं होतात. परंतु या स्पष्टीकरणावर काही चाहत्यांचं कधीच समाधान झालं नाही. आता नुकत्याच एका कार्यक्रमात पुन्हा एकदा या दोघांचं वागणं चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये विकी एका अभिनेत्रीचा हात हातात घेतल्याचं पहायला मिळत आहे. हे पाहून अंकिता त्याच्यावर चांगलीच भडकली आहे. इतकंच नव्हे अंकिता सर्वांसमोर त्याच्यावर ओरडतानाही दिसली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

‘फौजी 2’ या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात अंकिता आणि विकीने हजेरी लावली होती. त्याचसोबत अभिनेते मनोज बाजपेयी, गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार, मीरा चोप्रासुद्धा उपस्थित होते. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये विकीने अभिनेत्री मीरा चोप्राचा हात त्याच्या हातात घेतला होता. मीराचा हात धरूनच तो तिच्याशी गप्पा मारत होता. तेव्हा अंकिताचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि मीराचा हात त्याच्या हातात पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरील राग स्पष्ट दिसत होता.

विकी जेव्हा अंकिताकडे वळतो, तेव्हा ती त्याला सर्वांसमोर विचारते की, “तू काय करत होतास?” विकी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यावर अंकिता त्याला “गप्प बस” असं म्हटल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘विकी त्याच्या पत्नीला सोडून सर्व महिलांशी मैत्रीपूर्ण वागतो. तो सतत त्याच्या पत्नीचा अपमान करतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला अंकिताची कीव येते. तिला काय हवं होतं आणि काय मिळालं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पतीचं असं वागणं पाहून कोणालाही वाईट वाटू शकतं’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

अंकिताने विकी जैनशी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केलं. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता आणि विकीची सतत भांडणं पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आमच्यात सर्वकाही आलबेल असल्याचं दोघांनी बाहेर आल्यानंतर स्पष्ट केलं होतं.