‘असं वाटलं तिसऱ्या मजल्यावरून उडी मरावी’; विकी कौशलचे वडील का संपवणार होते आयुष्य?

बॉलिवूडमध्ये सध्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असलेला एक अभिनेता म्हणजे विरूकी कौशल. पण त्याचे वडिलांचंही तेवढंच मोठं नाव इंडस्ट्रीमध्ये आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक खडतर प्रसंगांबद्दल सांगितलं. त्यांना अक्षरश: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवावं असं वाटत होतं. नक्की असं काय घडलं होतं?

असं वाटलं तिसऱ्या मजल्यावरून उडी मरावी; विकी कौशलचे वडील का संपवणार होते आयुष्य?
Vicky Kaushal father Shyam Kaushal revealed that he had tried to end his own life.
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2025 | 5:00 PM

बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असणारा आणि टॉपलिस्टमध्ये असणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. विकी कौशलने त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण विकीचे वडील शाम कौशल देखील अ‍ॅक्शन डिरेक्टर होते. त्यांची देखील बॉलिवूडमध्ये खास ओळख होती. शाम कौशल हे कधीच फार कोणत्या मुलाखतींमध्ये दिसले नाही. पण नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीसाठी त्यांनी हजेरी लावली आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांबद्दल सांगितले. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे त्यांच्या आयुष्यात त्यांना एकदा आयुष्य संपवावं अशी इच्छा झाली होती. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याची इच्छा झाली होती.

विकी कौशलच्या वडिलांनी हा निर्णय का घेतला?

अलिकडेच झालेल्या एका पॉडकास्ट चॅटमध्ये शाम यांनी स्वतःचा जीव घेण्याचा विचार केला होता. शाम कौशल हे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत आहेत. 2003 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यानंतर त्यांना त्यांच्या कर्करोगाबद्दल कळले. त्या क्षणाची आठवण करून देताना ते म्हणाले, “मला एका संध्याकाळी याबद्दल माहिती मिळाली आणि मला धक्का बसला. तेव्हाच मी रात्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार केला, जिथे माझी खोली होती.मी हा निर्णय अशक्तपणामुळे घेतला नव्हता. तर विचार केला की जर मला नंतर मरायचेच आहे, आता का नाही? पण शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनांमुळे मी हालचालही करू शकत नव्हतो.”


“मी देवाकडे प्रार्थना करायचो की मला आताच बोलवून घे”

पुढे ते म्हणाले, ‘”मी देवाकडे प्रार्थना करायचो की मला आताच बोलवून घे. पण पुढच्याच दिवशी माझ्यामध्ये हिंमत आली. माझी मृत्यूची भीती निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी, मी नवीन आशेने उठलो की फक्त काही शस्त्रक्रिया आणि मी बरा होईन. या घटनेनंतर, जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे माझी इच्छाशक्ती बळकट झाली. मी देवाकडे 10 वर्षे मागितली होती आणि आज 22 वर्षे झाली आहेत. सर्व काही ठीक आहे. कुटुंब आनंदी आहे. माझा मुलगा विवाहित आहे आणि तो त्याच्या आयुष्यात चांगले काम करत आहे.’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या चित्रपटांसाठी काम केले आहे

तोपर्यंत कौशल हे इंडस्ट्रीमध्ये एक स्थापित नाव बनले होते. त्यांनी स्टंटमॅन म्हणून सुरुवात केली आणि नंतर 1990 च्या मल्याळम चित्रपट ‘इंद्रजालम’ द्वारे स्वतंत्र अॅक्शन डायरेक्टर बनले. गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’ आणि ऑस्कर विजेता ‘स्लमडॉग मिलेनियर’ सारख्या चित्रपटांसाठी स्टंट डिझाइन केले आहे.