‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?

Nagpur violence: 'काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय...', नागपूर हिंसाचारानंतर विकी कौशल स्टारर 'छावा' सिनेमाला ठरवलं जातंय जबाबदार, अभिनेत्याचं काय आहे कनेक्शन? औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर नागपुरात हिंसाचार उसळला आहे.

काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय..., नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या छावाशी कनेक्शन?
| Updated on: Mar 19, 2025 | 1:59 PM

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातील खुलताबाद येथे आहे. आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादानंतर नागपुरात हिंसाचार उसळला आहे. ज्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता विक्की कौशलच्या ‘छावा’ सिनेमाला जबाबदार धरलं. ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं.

सांगायचं झालं तर, सध्या नागपुरात तणावपूर्ण वातावरण आहे. याच कारणामुळे विकी कौशल आणि ‘छावा’ सिनेमाला लक्ष्य केलं जात आहे. यावर विकी कौशलच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. हिंसाचारासाठी विकी कौशल आणि त्याच्या सिनेमाला दोष देणं पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे, असं अभिनेत्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

 

 

एक नेटकरी म्हणाला, ‘नागपूर हिंसाचारासाठी विकी कौशलला दोष देणं अत्यंत चुकीचे आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नागपूर हिंसाचार प्रकरणी विकी कौशल याला दोष देणे अत्यंत चुकीचे आहे. छावा सिनेमात विकी फक्त भूमिका साकारली आहे. निर्मात्यांनी औरंगजेबाची क्रुरता दाखवली आहे. आता या देशातील काही लोकांसाठी औरंगजेब महान झाला आहे.’

 

 

विकी कौशल याचं समर्थन करत आणखी एक चाहता म्हणाला, ‘त्या लोकांवर संताप व्यक्त करा ज्यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी ‘छावा’ सिनेमाला जबाबदार ठरवलं आहे.’ सोशल मीडियावर विकीच्या चाहते अभिनेत्याची बाजू मांडताना दिसत आहेत.

काय म्हणाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराचे वर्णन पूर्वनियोजित असल्याचे सांगितले आणि जमावाने आधीच दुकाने आणि घरे फोडली होती आणि त्यांनाच लक्ष्य केले होते, अशी माहिती आहे. यामुळे हे षडयंत्र असल्याचा भास होतो. राज्यात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

देवेंद्र फडणवीस ने हिंसा को बताया पूर्वनियोजित

महाराष्ट्र विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे सांगितलं आणि जमावाने आधीच दुकाने आणि घरे फोडली होती आणि त्यांनाच लक्ष्य केलं होतं… यामुळे हे षडयंत्र असल्याचा भास होतो. राज्यात शांतता राखण्याचे आवाहन देखील फडणवीस यांनी यावेळी केलं.