‘नाना, नान्या..जर सहकलाकाराबाबतच्या…’ नीना कुलकर्णी यांचा नानांसोबतचा भावूक व्हिडीओ पोस्ट
नानाशी असलेली ही दोस्ती तुटायची नाही असेच अभिनेत्री भारती आचरेकर आणि नीना कुलकर्णी यांना वाटले असेल पण त्यांची साथ अर्ध्यावर सोडून नाना गेले आहेत.
हरहुन्नरी अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत.त्यांच्या निधनाने नाट्य आणि मराठी आणि हिंदी चित्रपटातील महत्वाचा दुवा निखळला आहे. असा जीवंत अभिनय यापुढे पाहायला मिळेल की नाही ही शंका व्यक्त केली जात आहे. नाना आणि त्यांच्या सहकलाकारांच्या मैत्रीला काय नाव द्यावे हे कळत नाही. हल्ली अशी ४० ते ५० वर्षे टिकणारी मैत्री पाहायला मिळतेय काय असे नानाच्या सहकलाकार भारती आचरेकर यांनी एकदा म्हटले होते. नीना कुलकर्णी,मी आणि नाना आमची निखळ मैत्री चार ते पाच दशके टिकून आहे असे भारती आचरेकर यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी नाना पाटेकर त्यांना झोका देत आहेत अशा व्हिडीओही पोस्ट केला आहे.
भारती आचरेकर त्यांच्या बिनधास्त आणि बेधडकपणामुळे चर्चेत असतात. भारती आचरेकर यांनी काही महिन्यांपूर्वी अमोल परचुरे यांना एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या नाना आणि नीना कुलकर्णी यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दलही वक्तव्य केले होते. भारती आचरेकर, नीना कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांची मैत्री ४० ते ५० वर्षे जुनी आहे. त्या मैत्रीबद्दल भारती आचरेकर यांनी महत्वाचे वक्तव्य केले होते.
येथे पाहा पोस्ट – https://www.instagram.com/p/DePGc5FDKlV/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==
“ दर दोन महिन्यांनी आम्ही भेटतो…”
भारती आचरेकर म्हणतात की , “नाना, नीना आणि मी, आमची मैत्री अजूनही घट्ट आहे. बाईंबरोबरही( विजया मेहता) आमचं नातं चांगलं होते. जवळजवळ दर दोन महिन्यांनी आम्ही बाईंना भेटायचो. अशी मैत्री आणि अशी माणसं आता मिळत नाहीत. आम्ही खूप छान आयुष्य उपभोगलेलं असून मला वाटत नाही की, हल्लीच्या पिढीत अशी आणि इतकी जुनी मैत्री टिकून आहे. ४०-५० वर्षे आमची मैत्री टिकून आहे, असं होत नाही.प्रत्येक वेळी मैत्रीतून काहीतरी प्रत्येक वेगळे पाहिजे असतं.आमची खूप छान, शुद्ध मैत्री राहिलेली आहे”, असे म्हणत भारती आचरेकर यांनी नाना पाटेकर आणि नीना कुलकर्णी यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल वक्तव्य केले होतं.

