
Vidya Balan headache remedy: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात डोकेदुखी एक सामान्य गोष्ट आहे. ऑफिसमध्या कामाचा तणाव, घर सांभाळणे… आर्थिक उलाढाल पाहणं… वाटतं तितकं सोपं नाही… यांमुळे अनेकदा डोकेदुखीचा सामना करावा लागतो. अनेक कामं वाट पाहणत असल्यामुळे आपण विचार न करता पेनकिलर घेतो आणि पुन्हा कामाला सुरुवात करतो… पण प्रसिद्ध अभिनेत्री डोकं दुखल्यानंतर कोणत्याच प्रकारचे औषधं घेत नाहीत… अभिनेत्रीकडे एक खास उपाय आहे ज्यामुळे डोकेदुखी लगेच बरी होते.
डोकं दुखू लागल्यानंतर एक वाक्य सतत बोलत राहिलात तर डोकेदुखी कमी होणार नाही तर, डोकेदुखी बंद होईल… हे ऐकायला थोडं वेगळं वाटत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विद्या हिने यावर मोठा खुलासा केला. सध्या सर्वत्र विद्या बालन हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
विद्याने सांगितल्यानुसार, जर तुम्ही डोकेदुखीवर असे म्हणता, Headache, you can leave now असं सतत काही वेळा बोलत राहिल्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. हा उपाय नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास आणि मनाला आराम देण्यास मदत करते. विद्या म्हणते की, ते विचारांना पुनर्प्रोग्राम करते आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करते.
वैज्ञानिकदृष्ट्या, ही पद्धत प्लेसिबो इफेक्ट किंवा माइंडफुलनेसचा भाग असू शकते. सकारात्मक विचार आणि मंत्रांचे पुनरावृत्ती ताण कमी करू शकते, जे डोकेदुखीचे एक प्रमुख कारण आहे. पण, गंभीर डोकेदुखीसाठी (जसे की मायग्रेन), डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
विद्या बालन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत विद्या बालन हिने चाहत्यांच्या मनात आणि बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. विद्या कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
अभिनेत्री आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विद्या कायम विनोदी अंदाजातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सोशल मीडियावर विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.