Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाने दिली समंथाबद्दलच्या प्रेमाची कबुली

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 28, 2022 | 5:18 PM

विजयने व्यक्त केलं समंथाबद्दलचं प्रेम; वाचा काय म्हणाला..

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाने दिली समंथाबद्दलच्या प्रेमाची कबुली
Vijay Deverakonda and Samantha
Image Credit source: Instagram

मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. मात्र त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. मुंबई एअरपोर्टवर या दोघांना काही वेळाच्या अंतराने पाहिलं गेलं होतं. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी कपूरने विजय हा ‘प्रॅक्टिकली मॅरीड’ असल्याचं म्हटलंय. या सर्व चर्चांदरम्यान खुद्द विजयने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. मात्र विजयचं ज्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं, ती रश्मिका नाही.

विजय देवरकोंडाने नुकतंच केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. या ट्विटमध्ये त्याने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या ‘यशोदा’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. त्याचसोबत त्याने समंथासाठी काही खास शब्द लिहिले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘मी कॉलेजमध्ये असताना तिला जेव्हा पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर पाहिलं, तेव्हा तिच्या प्रेमातच पडलो होतो. आज तिच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे आणि तिच्या कामाचं मला खूप अप्रूप वाटतं’, अशी पोस्ट लिहित विजयने समंथाच्या यशोदा या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला.

विशेष म्हणजे समंथा आणि विजय पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. खुशी या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलंय. शिव निर्वाणा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. समंथाने खुशी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर तिचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी विजयने तिला वाढदिवसाचं खास सरप्राइज दिलं होतं.

समंथाच्या आगामी ‘यथोदा’ या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. समंथाने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळी भूमिका ती यशोदामध्ये साकारणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI