AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू; निधनाचं धक्कादायक कारण समोर येताच खळबळ

कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला अखेरचा श्वास; निधनाचं धक्कादायक कारण समोर येताच सर्वत्र खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू; निधनाचं धक्कादायक कारण समोर येताच खळबळ
| Updated on: Aug 07, 2023 | 1:36 PM
Share

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं आहे. स्पंदना राघवेंद्र हिच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्पंदना राघवेंद्र हिचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्पंदना राघवेंद्र हिला ब्लड प्रेशरचा त्रास होता. म्हणून अभिनेत्याच्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला आणि स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं… अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय राघवेंद्र याच्या पत्नीला लो ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे स्पंदना राघवेंद्र हिला हृदयविकाराचा झटका आला. स्पंदना राघवेंद्र हिचं पार्थिव उद्या बेंगळुरूला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेथे अभिनेत्याच्या पत्नी अंत्यसंस्कार होतील… धक्कादायक गोष्ट म्हणजे, कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असताना स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं आहे.

बँकॉकमध्ये स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. परदेशात निधन झाल्यामुळे भारतात पार्थिव येण्यास वेळ लागत आहे. मंगळवारी अभिनेत्याच्या पत्नीचं पार्थिव बेंगळुरूला पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. स्पंदना हिच्या आकस्मिक निधनामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना हिने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. तिने सिनेमांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेला देखील न्याय दिला होता. तिने ‘अपूर्वा’ सिनेमात भूमिका बजावली होती. ऑगस्ट महिन्यात राघवेंद्र आणि स्पंदना लग्नाचा १६ वा वाढदिवस सारजा करणार होते. २००७ साली मोठ्या थाटात राघवेंद्र आणि स्पंदन यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव शौर्य असं आहे.

स्पंदना हिच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. स्पंदना अभिनेत्री असल्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. स्पंदना हिचं परदेशात निधन झाल्यामुळे काही प्रक्रिया पूर्ण झल्यानंतर तिचं मृतदेह भारतात येईल..

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.