AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमीषासोबतच्या रिलेशनशिपबद्दल अखेर विक्रम भट्ट यांनी सोडलं मौन; म्हणाले “जेव्हा वाईट काळ आला..”

अमीषा पटेल आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट हे जवळपास दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या नात्याविषयी विक्रम भट्ट मोकळेपणे व्यक्त झाले. 'गदर 2' प्रदर्शित होण्यापूर्वी अमीषानेही विक्रम भट्टसोबतच्या नात्याविषयी खुलासा केला होता.

अमीषासोबतच्या रिलेशनशिपबद्दल अखेर विक्रम भट्ट यांनी सोडलं मौन; म्हणाले जेव्हा वाईट काळ आला..
Ameesha Patel and Vikram BhattImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2023 | 1:51 PM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या ‘गदर 2’ या चित्रपटाच्या तुफान यशामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये अमीषा तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. एका मुलाखतीत तिने निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट्टसोबतच्या रिलेशनशिपविषयीचा खुलासा केला होता. आता विक्रम भट्ट हे अमीषासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. अमीषाने विक्रम भट्टसोबतचं नातं जाहीर केलं होतं. मात्र त्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. अमीषा आणि विक्रम हे जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते.

अमीषासोबतच्या नात्याबद्दल काय म्हणाले?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रम भट्ट म्हणाले, “अमीषा आणि मी एकत्र वाईट काळ पाहिला. मात्र जेव्हा आमचा चांगला काळ सुरू झाला, तेव्हा दुर्दैवाने आम्ही सोबत नव्हतो. माझे एकानंतर एक चित्रपट फ्लॉप होत होते. तीसुद्धा खूप संघर्ष करत होती. अखेर 1920 या माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आमचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर माझे शापित आणि हाँटेडसारखे चित्रपट प्रदर्शित झाले.”

“मी अमीषाचा संघर्ष पाहिला आहे. तिने कहो ना प्यार है, गदर, हमराजसारखे हिट चित्रपट दिले. मात्र काही काळानंतर इतर अभिनेत्री तिच्या पुढे निघून गेल्या. मीसुद्धा बऱ्याच दिग्दर्शकांना माझ्या मागून येऊन पुढे जाताना पाहिलं. त्यामुळे आम्ही दोघांनी कठीण काळाचा सामना केला आहे. म्हणून मी तिचं दु:ख समजतो. तिच्यासाठी स्टारडम गमावणं ही खूप मोठी गोष्ट होती”, असं विक्रम भट्ट म्हणाला.

“माझ्या करिअरला मोठा फटका”

अभिनेत्री सुष्मिता सेनशी ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्टने अमीषाला डेट करण्यास सुरुवात केली होती. 2006 मध्ये ‘आँखे’ या चित्रपटात काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या विक्रमच्या 1920 या चित्रपटानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. या नात्याविषयी बोलताना अमीषा म्हणाली होती, “या इंडस्ट्रीत प्रामाणिकपणाला कोणतीच जागा नाही आणि मी सर्वांत प्रामाणिक व्यक्ती आहे. माझ्या मनात जे असतं तेच माझ्या चेहऱ्यावर दिसतं. पण हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा ड्रॉबॅक ठरला आहे. निश्चितपणे मी फक्त ज्या दोन रिलेशनशिप्समध्ये होती आणि ज्याविषयी मी जाहीरपणे व्यक्त झाले, त्यांचाच माझ्या करिअरला मोठा फटका बसला. आता गेल्या 12-13 वर्षांपासून माझ्या आयुष्यात कोणीच नाही. फक्त शांतता आहे. मला माझ्या आयुष्यात दुसरं काहीच नकोय.”

Follow Us
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...