Marathi News Entertainment Vikrant Massey On religion, the actor did not write any religion of the child on the birth certificate reveals the choice
भाऊ मुस्लिम, वडील ख्रिश्चन आणि स्वतः हिंदू; विक्रांत मेस्सीचा मुलाच्या धर्माबाबत मोठा निर्णय, बर्थ सर्टिफिकेटची चर्चा
प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेला अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी, विक्रांत त्याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. कारण त्याच्या घरी वेगवेगळ्या धर्मांची संस्कृती दिसते. त्यामुळे त्याने त्याच्या मुलाच्या धर्माबाबच एक वेगळाच निर्णय घेतला आहे. त्याच्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट सर्वत्र व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमधला यशस्वी, प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेला अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. त्याने बऱ्याच संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये आपली खास अशी एक ओळख निर्माण केली आहे. विक्रांत मेस्सी त्याच्या अभिनयांमुळे, चित्रपटांमुळे तो जेवढा प्रसिद्ध आहे. तेवढाच तो त्याच्या घरात असणाऱ्या सर्वधर्मसमभावच्या संस्कृतीमुळेही चर्चेत असतो. अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब वेगवेगळ्या धर्मांचे पालन करते. त्याच्या भावाने मुस्लिम धर्म स्विकारला आहे, तर त्याचे वडील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात अन् आई हिंदू आहे. अशा परिस्थितीत, अभिनेता त्याच्या मुलाच्या धर्माबद्दल चर्चेत आला आहे. अलीकडेच विक्रांतने एका मुलाखतीत सांगितले की त्याने त्याच्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये धर्माच्या कॉलममध्ये काय ठेवले आहे? त्याने हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
विक्रांत धर्माबद्दल काय म्हणाला?
अलिकडेच, विक्रांत मेस्सी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये दिसला. यादरम्यान, अभिनेत्याने त्याच्या या सर्वधर्मसमभावबद्दल सांगितलं की, ‘मला वाटते की धर्म ही वैयक्तिक निवड आहे. माझ्यासाठी, ती एक जीवनशैली आहे. मला वाटते की प्रत्येकाला त्यांचा धर्म निवडण्याचा अधिकार आहे. माझ्या घरी तुम्हाला सर्व प्रकारचे धर्म आढळतील. मी पूजा करतो, गुरुद्वारात जातो, दर्ग्यातही जातो. या सगळ्यातून मला शांती मिळते.’ यादरम्यान, विक्रांतने खुलासा केला की त्याने त्याच्या मुलाचा वरदानचा धर्म त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर काय लिहिला आहे. तर त्याने या फॉर्मवरील कॉलममध्ये त्याचा मुलगा कोणत्या धर्माचे पालन करेल हे लिहिलेच नाहीये.
तुम्ही तुमच्या मुलाचा धर्म का लिहून घेतला नाही?
यबाबत विक्रांतने त्याचा मुलगा वरदानचाही उल्लेख केला. अभिनेता म्हणाला ‘माझ्या मुलाचा जन्म दाखला याबबात रिकामा आहे. जेव्हा त्याचा जन्म दाखला बनवला गेला तेव्हा त्यावर कोणताही धर्म लिहिलेला नव्हता. म्हणून सरकार तुम्हाला ते लिहायला सांगते असे नाही. ते तुमच्यावर अवलंबून आहे. जेव्हा आम्हाला जन्म दाखला मिळाला तेव्हा मी कॉलममध्ये एक डॅश टाकला.’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘वरदानने कोणत्याही धार्मिक लेबल किंवा भेदभावाशिवाय वाढले पाहिजे आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याने स्वतःच्या धर्माची निवड स्वत: करावी.’
विक्रांत मेस्सीच्या आगामी चित्रपटाची चर्चा
दरम्यान विक्रांत मेस्सीच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर काही ठिकाणी ट्रोलही केलं जात आहे. पण याबद्दल विक्रातने अद्याप कोणतही मत व्यक्त केलं नाही. किंवा या ट्रोलिंगचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं तर तो त्याच्या आगामी ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.