
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांनी फार मेहनतीने आणि अगदी छोट्या भुमिकांपासून सुरुवात केली आणि आज बॉलिवूडमध्ये त्यांची खास ओळख आहे. एवढंच नाही तर त्यांच्या नावाने प्रेक्षक चित्रपट पाहायला जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे मनोज वाजपेयी. मनोजच्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटाला भरपूर पसंती दिली आहे. आता त्याचा ‘जुगनुमा’ हा चित्रपट रिलीज होत आहे. याच चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी एक मजेदार किस्सा घडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनोज वाजपेयी यांच्या ‘जुगनुमा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी मजेशीर घटना
या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी अनुराग कश्यप आणि मनोज वाजपेयी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. मनोज वाजपेयी यांच्या ‘जुगनुमा’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांमध्ये जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील होते. दरम्यान स्क्रीनिंगवेळी या कलाकारांनी स्टेजवर असा प्रसंग घडवून आणला की सगळेच सुरुवातील थक्क झाले आणि नंतर कोणालाही हसू आवरेना. तसेच उपस्थित सर्वांनी नंतर कौतुकही केले आहे.
कलाकार स्टेजवर आले अन् मनोज वाजपेयींच्या पाया पडू लागले
जयदीप , अनुराग कश्यप आणि विजय वर्मा थेट स्टेजवर आले आणि मनोज वाजपेयींच्या पाया पडू लागले आणि ते सर्वजण एकत्र मनोज यांचे आशीर्वाद मागताना दिसले. त्याच दरम्यान, विक्रांत मेस्सी देखील धावत येतो आणि तो देखील मनोज यांच्या पाया पडताना दिसत आहे. खरं तर, विक्रांतने मनोजच्या पायावर थेट लोटांगण घालताना दिसला. स्टेजवर अचानक हे घडताना मनोजलाही समजलं नाही की हे काय घडतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी देखील याबाबत कौतुक करत आहेत.
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स
मनोज वाजपेयी आणि अनुराग कश्यप यांची मैत्री वर्षानुवर्षे जुनी आहे. दोघांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये एकत्र काम केले आहे आणि त्यांच्या मैत्रीची चर्चा त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच झाली आहे. आता या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया मजेदार येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे “ते सर्व खूप प्रतिभावान आहेत”, तसेच दुसऱ्याने म्हटले ” एकाच व्यासपीठावर तळागाळातील कलाकार” अनेकांनी कमेंट केली आहे की, ” ते सर्व उत्तम अभिनेते आहेत. आपल्याला त्यांचे प्रमोशन करण्याची गरज आहे.” दुसऱ्या चाहत्याने म्हटले “हे बॉलिवूडचे खरे हिरो आहेत”.
विनीत सिंग शेवटी स्टेजवर येऊन मनोजच्या पाया पडला
या व्हिडिओमध्ये विनीत सिंग देखील दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी, विनीत सिंग देखील मनोजच्या पाया पडताना दिसत आहे. नंतर, सर्वजण एकत्र पोज देताना दिसतात. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मनोजचा ‘ इन्स्पेक्टर झंडे ‘ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. आता ‘जुगनुमा’ हा मनोजचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता आहे.